ETV Bharat / state

सामाजिक भान राखत रुग्णवाहिका चालकांची ठरलेल्या दरात रूग्णसेवा

author img

By

Published : Apr 18, 2021, 4:44 PM IST

Updated : Apr 18, 2021, 6:29 PM IST

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच काही दिवसांत काही दिवसांपूर्वी इंधनाच्या दरांमध्ये देखील वाढ झाली होती. यामुळे सर्व वाहनधारकांनी प्रवासाचे दर वाढवले आहेत. असे असले तरी ॲम्बुलन्स चालकांनी सामाजिक भान राखत ॲम्बुलन्स दरांमध्ये वाढ केली नाही.

सामाजिक भान राखत रुग्णवाहिका चालकांची ठरलेल्या दरात रूग्णसेवा

औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच काही दिवसांत काही दिवसांपूर्वी इंधनाच्या दरांमध्ये देखील वाढ झाली होती. यामुळे सर्व वाहनधारकांनी प्रवासाचे दर वाढवले आहेत.असे असले तरी ॲम्बुलन्स चालकांनी सामाजिक भान राखत ॲम्बुलन्स दरांमध्ये वाढ केली नाही. गेल्या वर्षीच्या दर यावर्षी ठेवून त्याच दरांमध्ये रुग्णांची सेवा केली जात आहे.

जिल्ह्यात एकूण 538 रुग्णवाहिका-

जिल्ह्यात एकूण 538 ॲम्बुलन्स आहेत. शहरामध्ये घाटी रुग्णालयातर्फे 9 ॲम्बुलन्स रुग्णांची सेवा करत आहेत. तर खासगी रुग्णालयांसाठी 2 ॲम्बुलन्स कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांना सेवा देत आहेत. शहरातील या अकरा ॲम्बुलन्सच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना सेवा दिली जाते.

खासगी रुग्णवाहिकाचे असे आहे दर-

खासगी रुग्णवाहिका गेल्यावर्षी असलेल्या दारात रुग्णांना सेवा देत आहेत. शहरातील रुग्णांसाठी 600 रुपये आकारले जातात. शहराच्या बाहेर जायचं असल्यास 13 रूपये प्रति किलो मीटर प्रमाणे पैसे घेऊन सेवा दिली जाते. गेल्या काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेल किमतीत वाढ झाली आहे. असे असले तरी रुग्णवाहिका चालकांनी किमतीत वाढ केली नसल्याचे रुग्णवाहिका चालकांनी सांगितले.

सामाजिक संस्थांतर्फे मोफत सेवा-

कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांना शहरातील सामाजिक संस्थांतर्फे मोफत सेवा दिली जात आहे. यासाठी पंचशीला महिला बचत गट व मुस्कान सामाजिक संस्थेतर्फे ही सेवा पुरवली जात आहे. या सामाजिक संस्था स्वतःचे मनुष्यबळ वापरून रुग्णांना सेवा देत आहेत.ॲम्बुलन्स चालकांनी ठेवलेल्या सामाजिक भानामुळे कोरोनाच्या या कठीण काळात मृतांच्या नातेवाईकांचा आर्थिक भार कमी झाला आहे.

हेही वाचा - सोलापुरात तयार होतोय 'रेमडेसिवीर इंजेक्शन'चा कच्चा माल

Last Updated : Apr 18, 2021, 6:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.