ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये शालेय शुल्काविरोधात पालकांचे उपोषण

कोरोना काळात शालेय शुल्क कमी करावे, या मागणीसाठी पालकांनी चक्क शाळेसमोरच उपोषण केले. शालेय शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन लिंक देत नसल्याचा आरोप पालकांनी केला. तसेच, शाळेनी मनमानी कारभार बंद करावा, अशी मागणी पालकांनी केली.

author img

By

Published : Feb 2, 2021, 6:33 PM IST

School Fee oppose Aurangabad
शालेय शुल्काविरोधात पालकांचे उपोषण

औरंगाबाद - कोरोना काळात शालेय शुल्क कमी करावे, या मागणीसाठी पालकांनी चक्क शाळेसमोरच उपोषण केले. शालेय शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन लिंक देत नसल्याचा आरोप पालकांनी केला. तसेच, शाळेनी मनमानी कारभार बंद करावा, अशी मागणी पालकांनी केली.

माहिती देतान पालक

हेही वाचा - विनापरावानगी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी केली अटक

शाळा ऑनलाइन असूनही घेतले जाते पूर्ण शुल्क..

कोरोना काळामध्ये ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. तरी देखील खासगी शाळा पालकांकडून पूर्ण शैक्षणिक शुल्क वसूल करत आहेत. ऑनलाइन शिक्षण असल्याने स्कूल बससह इतर सुविधा विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. असे असले तरी त्याचे शुल्क पालकांकडून वसूल केले जात असल्याने हे शुल्क वसूल करू नये, अशी मागणी पालकांनी केली.

पोतदार शाळेसमोर पालकांचे दुसऱ्यांदा आंदोलन..

औरंगाबादच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कुल समोर पालकांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. कोरोना काळात अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. याबाबत पालकांनी शाळा प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार करून शैक्षणिक शुल्कात दिलासा मिळावा, असे विनंती अर्ज केले होते. मात्र, शाळा प्रशासनाने पालकांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे, याआधी देखील पालकांनी शाळेसमोर निदर्शने केली होती. मात्र, शाळा प्रशासन पालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने दुसऱ्यांदा पालकांनी आंदोलन करत एक दिवसाचे उपोषण केले.

विद्यार्थ्यांचे होत आहे मानसिक खच्चीकरण..

ऑनलाइन शिक्षण सुरू असताना शैक्षणिक शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शुल्क भरण्यासाठी वारंवार तगादा लावला जात आहे. शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन लिंक दिली जात नाही. त्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही, अशी सूचना दिली जात आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याची तक्रार पालकांनी केली. पालकांनी तक्रार करूनही शिक्षण विभाग खासगी शाळांवर कारवाई करत नसल्याचा आरोप पालकांनी केला.

हेही वाचा - अर्थसंकल्पात अल्पसंख्याक समाजावर अन्याय, मुस्लिम अभ्यासकांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.