औरंगाबाद - राजकारणात आपली वेगळी शैली निर्माण करणाऱ्या पंकजा मुंडे यांचे वेगळच रूप पाहायला मिळाले. त्यांनी स्वतःच्या हाताने चहा तयार करून कार्यकर्त्यांना पाजला. (Pankaja Munde made tea for the workers) औरंगाबादकडून बीडकडे जात असताना एका चहाच्या हॉटेलवर त्यांनी चहा तयार केला. त्यांना हॉटेलवर चहा करताना पाहून कार्यकर्त्यांना सह कार्यकर्त्यांसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
पंकजा मुंडे यांच्या हातचा "पीएम" चहा - बीडकडे जात असताना पंकजा मुंडे या चितेपिंपळगाव येथील देवगिरी नाष्टा सेंटर येथे थांबल्या. गेल्या काही दिवसांपासून मिसळ खायला या असे कार्यकर्त्यांनी आग्रह त्यांच्याकडे धरला होता. त्यामुळे त्या तिथे थांबल्या होत्या. मात्र गॅस बघून त्यांनी चहा करण्याची इच्छा दर्शवली आणि कार्यकर्त्यांसाठी चहा ठेवत माझ्या हातचा "पीएम" (पंकजा मुंडे) चहा प्या असं गमतीशीर वक्तव्य त्यांनी केलं. स्वयंपाक नेहमीच करते. मात्र, चहा क्वचितच तयार करते. हॉटेलमध्ये साहित्य बघून मोह आवरला नाही. त्यामुळे चहा करत असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. तर चहामध्ये विलायची आणि सुंठ टाकून कडक चहा तयार केला असे देखील त्यांनी सांगितले आहे.
माझ्या वाटेला येईल तसं मी घेते - राजकारण आणि चहा त्याचे वेगळेच नातं आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित पडल्या तर चहा चांगला होतो. तसेच राजकारणात देखील असल्याचे त्यांनी सांगितले. मला नेहमीच स्ट्रॉंग चहा आवडतो. मात्र, माझ्या वाट्याला येईल तसे मी घेत असते. जेवणात चव अड्जस्ट करून घ्यावी लागते असं म्हणत त्यांनी राजकारणातील आपला अनुभव वेगळ्या पद्धतीने सांगितला. मुंडे साहेबांना चिकन आणि मटन अनेकदा खाऊ घातल आहे. त्यांना चहा देखील पाजला आहे. भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माझे हातचा चहा पिलेला आहे. ते कधीच मला नाव ठेवणार नाहीत असे मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली आहे.