ETV Bharat / state

एक लाखाची लाच स्वीकारताना पैठणचा तहसीलदार अटकेत

author img

By

Published : Sep 29, 2019, 9:08 PM IST

हस्तकाच्या सहाय्याने एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पैठणच्या तहसीलदाराला पकडले. लाच-लुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)च्या पथकाने तहसीलदार महेश सावंतला दोन हस्तकांसह अटक केली.

तहसीलदार महेश सावंत

औरंगाबाद - जमिनीचा निकाल लावण्यासाठी एक लाख रुपयांची लाच हस्तकाच्या सहाय्याने स्वीकारताना पैठणच्या तहसीलदाराला पकडले. लाच-लुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)च्या पथकाने तहसीलदार महेश सावंतला दोन हस्तकांसह अटक केली.

हस्तकाच्या सहाय्याने एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पैठणच्या तहसीलदाराला पकडले

कैलास सोपान लिपणे आणि बद्रीनाथ भवर असे तहसीलदाराच्या खासगी हस्तकांची नावे आहेत. तक्रारदार शेतकऱ्याची 12 एकर कुळाच्या जमिनीचे प्रकरण तहसीलदार महेश सावंत यांच्या समोर सुरू होते. या प्रकरणाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी सावंत यांनी 30 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रार दिली.

हेही वाचा - सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाला सुरुवात, भाविकांची अलोट गर्दी

तक्रार दाखल होताच लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पैठणच्या तहसील कार्यालयात सापळा रचला. तहसीलदार कार्यालयात लाच स्वीकारत असतानाच एसीबीच्या पथकाने तिघांना रंगेहात अटक केली.

Intro:कुळाच्या जमिनीचा निकाल लावण्यासाठी 30 लाख रुपयांची मागणीकरून एक लाख रुपयांची लाचेची टोकन रक्कम खाजगी पंटर च्या साहाय्याने स्वीकारताना तहसीलदार कार्यालयातच पैठणचे तहसीलदार महेश सावंत यांना दोन पटरसह अँटी करप्शन ब्युरो च्या पथकाने रंगेहात अटक केली
कैलास सोपान लिपणे आणि बद्रीनाथ भवर असे तहसीलदार यांच्या खाजगी पंटर चे नाव आहे..

Body:पैठण तालुक्यातील तक्रारदार शेतकऱ्यांची 12 एकर कुळाच्या जमिनीचा प्रकरण तहसीलदार महेश सावंत यांच्या समोर सुरू होते.या प्रकरणाचा निकाल तक्रारदार यांच्या बाजूने लावण्यासाठी सावंत यांनी 30 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रार दिली.
तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने आज पैठण येथील तहसील कार्यालयात सापळा रचला व सावंत यांच्या दालनात पैशे देण्याचे ठरले. दुपारच्या सुमारास तहसीलदार यांच्या दालनात सावंत व मध्यस्थी असलेले वकील लिपणे व पंटर भवर हे बसलेले असताना त्यांनी तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारली त्याच वेळी छापा मारून एसीबी च्या पथकाने तिघांना रंगेहात अटक केली.

बाईट-
बी.बी.गावडे,उप अधीक्षक acb, औरंगाबादConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.