ETV Bharat / state

मंगळवारपासून पैठण तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन; प्रशासनाचा निर्णय - पैठण कोरोना अपडेट

गेल्या दहा दिवसांपासून तालुक्यात व शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शनिवारी आमदार संदिपान भुमरे यांनी प्रशासन व व्यापारी संघटनांची नाथ समाधी मंदिरात तातडीची बैठक घेऊन कोरोना संबंधित चर्चा केली. प्रशासन, लोक प्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पैठण शहर व तालुका येत्या मंगळवारपासून सात दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Paithan Corona Meeting
पैठण कोरोना बैठक
author img

By

Published : Jul 12, 2020, 12:15 PM IST

औरंगाबाद - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद शहरात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पैठण शहर आणि तालुक्यात पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तालुक्यातील व्यापारी महासंघ व प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत येत्या मंगळवारपासून (14 जुलै) लॉकडाऊन लावण्याचा निर्णय झाला.

काल आमदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, मुख्य अधिकारी सोमनाथ जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. विजय कुमार वाघ, प्रपाठक डॉ. ऋषिकेश खाडिलकर, डॉ. संदीप रगडे, आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. तर लोकप्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष सुरज लोळगे, गटनेता तुषार पाटील, नगरसेवक हस्मुद्दिन कट्यारे, बाळू माने, महेश जोशी, सलीम शेख, जितू परदेशी, समाजसेवक, व्यापारी महासंघाचे व भाजप व्यापारी आघाडीचे काही पदाधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीला पैठण शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या खूप कमी असल्याने प्रशासन निवांत होते. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून तालुक्यात व शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शनिवारी आमदार संदिपान भुमरे यांनी प्रशासन व व्यापारी संघटनांची नाथ समाधी मंदिरात तातडीची बैठक घेऊन कोरोना संबंधित चर्चा केली. प्रशासन, लोक प्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पैठण शहर व तालुका येत्या मंगळवारपासून सात दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, याबाबत सोशल मीडियावर पैठणच्या नागरिकांनी लॉकडाऊनसंबंधी संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या. काही नागरिकांनी सात दिवसांच्या लॉकडाऊनचे समर्थन केले तर रोजंदारीने काम करणार्‍या लोकांनी पुन्हा काम बंद होईल म्हणून नाराजी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.