ETV Bharat / state

मराठवाडा - आघाडीला अस्तित्व टिकवण्याचे आव्हान; आढावा....

मराठवाड्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीचे गणित पाहिलं तर 46 जागांपैकी युतीला 23 जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर काही अपक्ष आमदारांनी प्रवेश केल्याने युतीची ताकद वाढली आहे. त्यात बीड आणि उस्मानाबादच्या बड्या नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर युतीत पक्षप्रवेश केल्याने आघाडीची ताकद कमी झाल्याचे चित्र आहे.

मराठवा़डा
author img

By

Published : Sep 21, 2019, 11:59 AM IST

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला आपलं अस्तित्व टिकवण्याचे आव्हान असणार आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ पैकी सात जागांवर युतीला यश मिळालं तर औरंगाबादच्या एक जागेवर एमआयएमने विजय मिळवला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आघाडीला अपयश मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात अस्तित्व 'टिकवण्याचे आव्हान काँग्रेस - राष्ट्रवादी कसे पेलणार हे पाहणे म्हत्वाचे असणार आहे.

मराठवा़डा - राजकीय परिस्थितीचा आढावा...

हेही वाचा - उत्तर महाराष्ट्र विभाग : युतीच्या जागा टिकणार की वाढणार? काँग्रेस राष्ट्रवादीसाठी मात्र अस्तित्वाची लढाई

मराठवाड्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीचे गणित पाहिलं तर 46 जागांपैकी युतीला 23 जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर काही अपक्ष आमदारांनी प्रवेश केल्याने युतीची ताकद वाढली आहे. त्यात बीड आणि उस्मानाबादच्या बड्या नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर युतीत पक्षप्रवेश केल्याने आघाडीची ताकद कमी झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - पश्चिम महाराष्ट्र विभाग - कोण मारणार 'बाजी'? राजकीय परिस्थितीचा आढावा...

2014 आधी म्हणजेच मोदी लाट येण्याआधी मराठवाड्यात कोणत्याही पक्षाचा दबदबा कायम राहिला नाही. 2009 च्या निवडणुकीत युतीला नाकारणाऱ्या मराठवाड्याने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युतीला भरभरून मत मिळाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सेना - भाजपला 23 जागांवर विजय मिळाला मात्र, त्यानंतर पाच वर्षात अनेक अपक्ष भाजप - सेनेत दाखल झाले. त्यामुळे युतीच्या आमदारांची संख्या वाढली. मराठवाड्यात पक्षीय बलाबल पाहता....

  • औरंगाबाद : भाजप - 3, काँग्रेस - 1, शिवसेना - 3, राष्ट्रवादी - 1, एमआयएम - 1
  • जालना : भाजप - 3, काँग्रेस - 0, शिवसेना - 1, राष्ट्रवादी - 1
  • बीड : भाजप - 5, काँग्रेस - 0, शिवसेना - 0, राष्ट्रवादी - 1
  • लातूर : भाजप - 3, काँग्रेस - 3, शिवसेना - 0, राष्ट्रवादी - 0
  • उस्मानाबाद : भाजप - 0, काँग्रेस - 1, शिवसेना - 1, राष्ट्रवादी - 2
  • परभणी : भाजप - 1, काँग्रेस - 0, शिवसेना - 1, राष्ट्रवादी - 2
  • हिंगोली - भाजप - 1, काँग्रेस - 1, शिवसेना - 1, राष्ट्रवादी - 0
  • नांदेड : भाजप - 1, काँग्रेस - 3, शिवसेना - 4, राष्ट्रवादी - 1
  • अशी आमदारांची संख्या आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युतीचे पारडे जड मानले जात असल्याने काँग्रेस - राष्ट्रवादीला धोक्याची घंटा मानली जात आहे.

मराठवाड्यातील लक्षवेधी निवडणूक असणार आहे ती बीड जिल्ह्यात. एकीकडे पंकजा मुंडे विरोधात धनंजय मुंडे आणि दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर विरोधात त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर अशी लढत पाहायला मिळणार आहे. मराठवाड्यात जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत तर उस्मानाबादेत राणा जगजीत सिंहने भाजपमध्ये प्रवेश केल्याने या दोन नेत्यांनी घेतलेला निर्णय मतदारांना मान्य होईल का, हे पाहण्यासारखे असेल. औरंगाबाद मध्य या मतदारसंघात सर्वांना धक्का देत एमआयएम पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला होता. इम्तियाज जलील यांनी लोकसभा जिंकल्यानंतर आता त्यांची जागा टिकवण्याचे आव्हान एमआयएमसमोर असणार आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचितच्या फॅक्टरमुळे अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. लोकसभेत मित्रपक्ष असलेला एमआयएम आता वंचितसोबत नसल्याने मुस्लीम मतदारांच्या मतांचे विभाजन कशा पद्धतीने होते त्यावर अनेकांच्या विजयाची गणित अवलंबून असणार आहेत. त्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात कस लागणार आहे तो काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचा.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.