ETV Bharat / state

कुटुंब साखरपुड्याला जाताच चोरट्यांनी साधला डाव, भर दिवसा घरफोडी

परसराम नरवडे हे बिडकीन येथे साखरपुड्यासाठी गेले होते. त्यांचा मुलगा आणि सून हे मकर संक्रांतीचे सामान खरेदीसाठी गंगापूर येथे गेले होते. घरात कोणी नसल्याचा संधी साधत चोरट्यांनी घराचा पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

कुटुंब साखरपुड्याला जाताच चोरट्यांनी साधला डाव, भर दिवसा घरफोडी
कुटुंब साखरपुड्याला जाताच चोरट्यांनी साधला डाव, भर दिवसा घरफोडी
author img

By

Published : Jan 13, 2020, 3:18 PM IST

औरंगाबाद - गंगापूर तालुक्यातील पखोरा येथे भरदिवसा चोरट्यांनी घरफोडी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंद घराचा मागचा दरवाजा तोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण 1 लाख 32 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरीची ही घटना १२ जानेवारीला भर दुपारी 1 ते 3 वाजताच्या सुमारास घडली आहे. परसराम नामदेव नरवडे असे चोरी झालेल्या घर मालकाचे नाव आहे.

परसराम नरवडे हे बिडकीन येथे साखरपुड्यासाठी गेले होते. त्यांचा मुलगा आणि सून हे मकर संक्रांतीचे सामान खरेदीसाठी गंगापूर येथे गेले होते. घरात कोणी नसल्याचा संधी साधत चोरट्यांनी घराचा पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातून त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम 23,000 रुपेय असा एकूण 1 लाख 32 हजार पाचशे रुपयांचा घेऊन पोबारा केला. परसराम नरवडे हे घरी आले असता, त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशनला दिली.

गंगापूर पोलीस स्टेशनचे सपोनि प्रल्हाद मुंडे हे पोलीस टिमसह घटनास्थळी जाऊन त्यांनी पंचनामा केला. या प्रकरणी परसराम नरोडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे करीत आहेत. या तपास प्रकरणी फिंगरप्रिंट एक्सपर्टला बोलावण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Intro:साखरपुड्याला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडले.
भरदिवसा चोरी झाल्याने नागरीकांध्ये दहशत.

औरंगाबाद- गंगापूर तालुक्यातील पखोरा येथे भर दिवसा चोरट्यांनी बंद घराचा मागच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने सह रोख २३ हजार रुपये असा एकूण एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयाचा माल लंपास केल्याची घटना १२ जानेवारी रोजी दुपारी एक ते तीन वाजेच्या सुमारास घडली.
Body:याविषयी अधिक माहिती अशी की, परसराम नामदेव नरवडे हे बिडकीन येथे साखरपुड्यासाठी गेली होते व त्यांचा मुलगा व सून हे मकर संक्रांति चे सामान खरेदीसाठी गंगापूर येथे गेले याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा पाठीमागील दरवाजा तोडून घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम 23000 असे एकूण एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपये घेऊन पोबारा केला परसराम नरवडे हे घरी आले तीन वाजता आले त्यावेळेस त्यांनी घरात बघितले असता घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होतं त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की आपल्या घरात चोरी झाली याची माहिती त्यांनी गंगापुर पोलिस स्टेशनला दिली असता गंगापूर पोलिस स्टेशनचे सपोनि प्रल्हाद मुंडे हे पोलिस टिमसह घटनास्थळी जाऊन त्यांनी पंचनामा केला. याप्रकरणी परसराम नरोडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेConclusion:याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राम हरी चाटे करत आहे उद्या सकाळी फिंगरप्रिंट एक्सपर्ट बोलावण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.