औरंगाबाद - राज्यात नोकर भरती थांबवण्याचे आवाहन मराठा समाजाकडून करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारच्या अनेक विभागातून नोकरभरतीच्या जाहीराती काढण्यात आल्या. नोकर भरती काढणाऱ्या मंत्र्यांविरोधात आता ७ फेब्रुवारीपासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. प्रत्येक मंत्र्याच्या जिल्ह्यात वेगवेगळी एल्गार परिषद घेण्याची घोषणा शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी केली आहे.
राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या जिल्ह्यात एल्गार परिषदेचे आयोजन- विनायक मेटे - Vinayak Mete news
शरद पवार यांनी जर मनात आणले असते तर मराठा समाजाचे अनेक प्रश्न सुटले असते. मात्र तसे झाले नाही त्यामुळे पवारांच्या विरोधात बारामती येथे एल्गार परिषद पुकारण्यात येणार असल्याचेही मेटे म्हणाले.
विनायक मेटे
औरंगाबाद - राज्यात नोकर भरती थांबवण्याचे आवाहन मराठा समाजाकडून करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारच्या अनेक विभागातून नोकरभरतीच्या जाहीराती काढण्यात आल्या. नोकर भरती काढणाऱ्या मंत्र्यांविरोधात आता ७ फेब्रुवारीपासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे. प्रत्येक मंत्र्याच्या जिल्ह्यात वेगवेगळी एल्गार परिषद घेण्याची घोषणा शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांनी केली आहे.
Last Updated : Jan 30, 2021, 2:06 PM IST