छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : अवकाळी पावसामुळे कांदा, गहु, अद्रक, तमाटा, बटाटा, बाजरी इत्यादी पिके जमीन दोस्त झाले. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारी मदतीकडे बळीराजा डोळे लाऊन बसला आहे. तर कृषिमंत्री अब्दुल सत्तार राज्यात नुकसानग्रस्त शेती भागाची पाहणी करत असून सरकार सर्वोपरी मदत देण्याचा प्रयत्न करणार आश्वासन त्यांनी दिले.
मराठवाड्यात पावसाची शक्यता: दोन दिवसांपूर्वी हवामान तज्ज्ञांनी मराठवाड्यासह राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली होती. रविवारी दुपारनंतर अचानकच वातावरणात मोठा बदल अनुभवायला मिळाला. दुपारी कडक ऊन पडल्यानंतर, चार नंतर मात्र थंड वारे वाहू लागले. संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी वादळी वाऱ्याने हजेरी लावली.
कृषिमंत्रीनी केली नुकसानीची पाहणी: कन्नड तालुक्यातील औराळा, चापानेर या परिसरात वीस मिनिटे मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या ठिकाणी गहू, अद्रक, टमाटा, बटाटा, कांदा अशा पिकांचं मोठं नुकसान झाले. तर बीड जिल्ह्यामध्ये वीज पडून एक जण ठार झाला आहे. आष्टी तालुक्यात ही घटना झाली आहे. माजलगाव भागात दोन जण जखमी झाले, वीस जनावर दगावले आहेत. केज, बीड, पाटोदा या भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. याबाबत नुकसानीची पाहणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान: मागील आठवड्यात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर वीज पडून काही जणांना आपला जीव गमावा लागला, काही जनावरही वीज पडल्यामुळे दगावले आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारच्या वतीने काही ठिकाणी पंचनामे सुरू करण्यात आले आहे, तर बांधावर जाऊन कृषी मंत्री यांनी नुकसानीची पाहणी केली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश होऊ नये: कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहनी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत सरकार लवकरच निर्णय घेतील, असे आश्वासन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
हेही वाचा: Unseasonal Rain नाशिक जिल्ह्यात गारांचा अवकाळी पाऊस रब्बी पिकांचे मोठे नुकसान