औरंगाबाद - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांमुळे राजकीय वातावरण तापले असल्याचੇ पाहायला मिळत आहे. त्यात आता 1 मे रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला अनेक राजकीय आणि समाजिक संघटनानी विरोध केला आहे. तसे निवेदन पोलिसांना देण्यात आले असून पोलिसांनी त्याबाबत आढावा बैठक घेत चर्चा केली आहे.
समाजिक सलोखा बिघडेल म्हणून विरोध - शहरातील सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदानावर 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, या सभेला आता विविध पक्ष संघटनांकडून विरोध करत सभेला परवानगी देऊ नये, दिल्यास सभा उधळू असा इशारा काही सामाजिक संघटनांनी दिला आहे. मस्जिदवरील भोंगे काढा यासाठी 3 मे पर्यंत मुदत दिली आहे. त्याआधी होणाऱ्या सभेमुळे समाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याने हा विरोध केला जातोय तसे निवेदन संघटनानी पोलिसांना दिले आहे.
या संघटनानी केला विरोध - राज ठाकरे यांच्या सभांना अनेक पक्षांनी विरोध केले आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे, भारतीय दलित पँथरचे लक्ष्मण भूतकर, प्रकाश पवार, नझिम काझी यांनी पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. तर रिपब्लिकन ऑफ इंडिया (खरात) चे जिल्हाध्यक्ष आदित्य वाहूळ यांनी जिलजाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्या नंतर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
राज ठाकरेंच्या सभेला विविध संघटनांचा विरोध, पोलीस आयुक्तांना निवेदन - aurangabad raj thackray latest news
राज ठाकरे यांच्या सभांना अनेक पक्षांनी विरोध केले आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे, भारतीय दलित पँथरचे लक्ष्मण भूतकर, प्रकाश पवार, नझिम काझी यांनी पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. तर रिपब्लिकन ऑफ इंडिया (खरात) चे जिल्हाध्यक्ष आदित्य वाहूळ यांनी जिलजाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.