ETV Bharat / state

शेतकऱ्यांना तातडीनं पन्नास हजार हेक्टरी मदत करा - अंबादास दानवे

Ambadas Danve : विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी केली आहे. अवकाळीमुळं राज्यात मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी असं अंबादास दानवे म्हणाले.

Ambadas Danve press conference
अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 11:05 PM IST

छत्रपती संभाजीनगर Ambadas Danve : राज्यात अवकाळी पावसानं शेतकर्‍यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मराठवाड्यात 60 हजार हेक्टर पीकांची नासाडी झाली आहे. त्यांना मदत देण्याऐवजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना या गंभीर परिस्थितीचं कसलंही सोयरसुतक नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतर राज्यात निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत. त्यांना शेतकर्‍यांच्या या नुकसानीचं गांभीर्य नाही. राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी मतद द्यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

विरोधी पक्षानं केली पाहणी : अंबादास दानवे यांनी आज बुलडाणा, जालना, संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांची भेट घेऊन शेतकर्‍यांच्या नुकसानीबाबत चर्चा केली. यावेळी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शिष्टमंडळानं विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं. यामध्ये मराठवाड्यातील सर्व विभागातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी त्यांनी केलीय. ज्या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे, त्या मंडळात सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, शेडनेटचं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा समावेश नुकसान भरपाईत करण्यात यावा असं दाववे यावेळी म्हणाले. तसंच नुकसानीच्या अर्ज ऑफलाईन, ऑनलाईन घेण्याची मुदत वाढविण्याबाबत संबंधित विमा कंपन्यांना निर्देश द्यावेत, अशा मगण्या विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केल्या.

पीकविमा कंपन्या सरकारला जुमानत नाही : पीक विमा कंपन्या सरकारला जुमानत नाही, सरकार मधील काही लोक विमा कंपन्यासोबत आहेत का? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थितीत केला. मुख्यमंत्री यांनी पीक विमा कंपन्यासोबत बैठक घेतली. मात्र दिलेल्या आदेशाला विमा कंपन्या जुमानत नाहीत. त्यामुळं या सगळ्या कंपन्या सरकारला जुमानत नाही का? असा प्रश्न निर्माण होतोय. एक रुपयात शेतकऱ्यांना विमा देण्यात आला. उर्वरित पैसे सरकारने भरले, असं असूनही विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत देत नाहीय. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर राज्यातील सर्व शेतकर्‍यांचा सण गोड होणार असल्याची घोषणा कृषी मंत्र्यांनी केली होती. मात्र शेतकर्‍यांची दिवाळी अजूनही गोड झाली नाही. पीक विमा अजूनही मिळालेला नाही. राज्यातील फक्त 40 तालुकेच दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात दुष्काळ घोषित करून गरजवंत शेतकर्‍यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी राज्य सरकारकडं केली.

हेही वाचा -

  1. अवकाळीग्रस्तांना लवकरच मदत मिळणार, तातडीनं पंचनाम्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, झोपडपट्टीधारकांसाठीही खुषखबर
  2. सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं - बाळासाहेब थोरात
  3. साताऱ्यात गुलाबी थंडी अन् दाट धुकं; दवबिंदूंमुळं रस्ते ओले चिंब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.