ETV Bharat / state

धार्मिक स्थळे खुली करा; पैठणमधील भाविकांची मागणी

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याच पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, आता कोरोना रुग्णसंख्येत कमी होत आहे. यामुळे राज्य सरकारकडून पाच स्तरांमध्ये जिल्हे विभागण्यात आल्या आहेत.

author img

By

Published : Jun 22, 2021, 7:55 AM IST

open religious places demand by by devotees in paithan
धार्मिक स्थळे खुली करा; पैठणमधील भाविकांची मागणी

पैठण (औरंगाबाद) - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. यामुळे राज्य सरकारकडून राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारपासून सर्व आस्थापने, पर्यटनस्थळांसह सर्व सेवा सुरू करण्यात आल्या आहे. मात्र, धार्मिक स्थळे खुले करण्यासाठी अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. म्हणून आता धार्मिक स्थळे खुले करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी येथील भाविकांनी केली. सोमवारी निर्जला एकादशी निमित्ताने पैठण येथील संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

धार्मिक स्थळे बंद असल्याने भाविक नाराज -

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याच पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, आता कोरोना रुग्णसंख्येत कमी होत आहे. यामुळे राज्य सरकारकडून पाच स्तरांमध्ये जिल्हे विभागण्यात आल्या आहेत. यानुसार नियम शिथिल करण्यात आले आहेत. सोमवारी रोजी निर्जला एकादशी निमित्ताने पैठण येथील संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र, शासनाच्या निर्बंधामुळे सर्वच धार्मिक स्थळे बंद असल्याने भाविकांना निर्जला एकादशीच्या निमित्ताने नाथांच्या समाधी मंदिराच्या बाहेरुन दर्शन घेवून समाधान मानावे लागत आहे. यावेळी भाविकांनी दर्शना दरम्यान धार्मिकस्थळे लवकरात लवकर शासनाने सुरु करावी, अशा मागणी भाविकांनी केली आहे.

हेही वाचा - VIDEO : वेरूळ लेणीच्या पायथ्याशी योग दिन साजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.