ETV Bharat / state

सिल्लोडमध्ये भरधाव स्कॉर्पिओ उलटली; एक ठार, दोन जण जखमी - sillod latest news

सिल्लोड शहरातील जळगाव रोडवर भरधाव जाणारी एक स्कॉर्पिओ जोरदारपणे तीन ते चार पलटी खाऊन उलटून सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

One killed, two injured in Scorpio over turning in Sillod
सिल्लोडमध्ये भरधाव स्कॉर्पिओ उलटली
author img

By

Published : Aug 10, 2021, 12:31 PM IST

सिल्लोड - शहरात जळगाव महामार्गावर भराडी फाट्याजवळ रात्री दोन वाजेच्या सुमारास भरधाव जाणारी स्कॉर्पिओ उलटली होती. या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाले आहेत.

सिल्लोडमध्ये भरधाव स्कॉर्पिओ उलटली

अपघातात एक जण जागीच ठार -

सिल्लोड शहरातील जळगाव रोडवर भरधाव जाणारी एक स्कॉर्पिओ जोरदारपणे तीन ते चार पलटी खाऊन उलटून सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष -

गेल्या अनेक दिवसांपासून सिल्लोड शहरासह परिसरात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून शहरात भरधाव वाहने चालविणाऱ्याचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अपघात विरहित व सुरळीत करण्याचे आवाहन प्रशासनासमोर उभे राहिलेले आहे. मात्र, प्रशासन सर्रास या घटनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर येत आहे, त्यामुळे अश्या अपघाताच्या घटना होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा - WORLD LION DAY : 'गीर' सिंहांची आशियातील सर्वात सुरक्षित भूमी

हेही वाचा -हे सुवर्ण पदक माझ्या एकट्याचं नाही तर संपूर्ण देशाचं - नीरज चोप्रा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.