औरंगाबाद : औरंगाबाद -नगर महामार्गावर कायगावजवळ जेसीबी व क्रुझर जीपच्या अपघातात (cruiser Jeep JCB accident in Gangapur) एक ठार तर सात गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजे दरम्यान घडली आहे. क्रुझर जीपमधील एका महिलेचा मृत्यू तर सात महिला गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती (One killed and seven seriously injured in accident) आहे. अपघातातील क्रुझर जीप चा समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.
जखमीवर उपचार सुरू : क्रुझर जीप व जेसीबीच्या भीषण झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलांना सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत व सहकारी, पोलीस, स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठवण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. पोलिसांच्या मदतीने महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात (accident in Gangapur Aurangabad) आली.
चार दिवसापूर्वी याच ठिकाणी अपघात : औरंगाबाद नगर महामार्गावर अपघाताची सत्र सुरूच आहे. चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी दोन कारचा भीषण अपघात घडला होता. यात बजाज नगर येथील चार जणांचा जागेवरच मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. औरंगाबाद नगर महामार्गावरील ब्लॅक स्पॉट घातक ठरत (One killed and seven seriously injured) आहे.