औरंगाबाद - चार वर्षांपूर्वी सोबत वैधकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणानेच डॉक्टर मैत्रिणीला फेसबुकवर अश्लील पोस्ट टाकून बदनामी करण्याची धमकीदेत खंडणी मगितल्याचा प्रकार समोर आला आहे. बेगमपुरा पोलिसानी त्या तरुणाला अटक केली आहे. ओमकार त्रिंबक पवार (वय-21, रा.बीड) असे आरोपीचे नाव आहे.
गंगापूर तालुक्यातील 21 वर्षीय पीडिता आणि आरोपी हे शहरातील एका वैधकीय महाविद्यालयात 2016 मध्ये सोबत प्रथम वर्षात शिकत होते. दरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली होती. ओमकार प्रथम वर्षात नापास झाल्यानंतवर काही कारणास्तव पीडितेने त्याच्यासोबत बोलणे बंद केले होते. या वरून संतापलेल्या ओमकारने पीडितेला रस्त्यावर थांबवत तू मला आवडतेस तुझ्यामुळे मी नापास झालोय.मला एक वर्षाची नुकसान भरपाई दे असा तगादा लावला होता. पीडितेने प्रतिसाद न दिल्याने आरोपीने पीडितेच्या इंस्टाग्राम या सोशल मीडियावरून अनेकांना पोस्ट केल्या.एवढ्यावरच न थाम्बता त्याने पीडीतेकडे पैशाची मागणी केली. पैशे न दिल्यास फेसबूक आणि इतर सोशल माध्यमावर पीडितेचे फोटो टाकण्याची धमकी दिली. वैतागलेल्या तरुणीने ही बाब वडलांना सांगितली, आणि पोलीस ठाण्यात तक्रार दिली. बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी ओमकार ला अटक केली आहे.