ETV Bharat / state

रेल्वेची वेबसाईट हॅक करून तिकीटांचा काळाबाजार; एकाला अटक - बनावट रेल्वे तिकीट रॅकेट

रेल्वेची वेबसाईट हॅक करून रेल्वेच्या 'तत्काळ' तिकीटांचे काही मिनिटांत बुकिंग करण्याचे रॅकेट दुबईतील हमीद अशरफ चालवत होता. बेवसाईट हॅक करून जनरेट झालेली लिंक हमीद दुबईतून भारतातील त्याच्या संपर्कातील लोकांना पाठवत असे. यामध्ये सोहेल अहमद याचा समावेश आहे.

आरोपी सोहेल अहमद
आरोपी सोहेल अहमद
author img

By

Published : Jan 25, 2020, 7:38 PM IST

औरंगाबाद - रेल्वेची वेबसाईट हॅक करून 'तत्काळ' तिकीटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी औरंगाबादच्या बुढ्ढीलेन भागातून एकाला अटक करण्यात आली. सोहेल अहमद असे त्याचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशाच्या गौडा येथील रहिवासी आहे. दुबईतून रेल्वेची वेबसाईट हॅक करणाऱ्या हमीद अशरफ याच्या तो संपर्कात होता.

तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्याला एकाला अटक

अटक केलेला सोहेल सहा वर्षांपासून औरंगाबाद येथे वास्तव्यास आहे. बुढ्ढीलेन भागात तो कपडे शिवण्याचा व्यवसाय करत होता. रेल्वेची वेबसाईट हॅक करून रेल्वेच्या 'तत्काळ' तिकीटांचे काही मिनिटांत बुकिंग करण्याचे रॅकेट दुबईतील हमीद अशरफ चालवत होता. वेबसाईट हॅक करून जनरेट झालेली लिंक हमीद दुबईतून भारतातील त्याच्या संपर्कातील लोकांना पाठवत असे. काही दिवसांपूर्वी दुबई पोलिसांच्या मदतीने हमीद अशरफ याची चौकशी करण्यात आली.

हेही वाचा - 'स्विगी'चा 'डिलिव्हरी ब‍ाॅय' निघाला चोरटा; साताऱ्यातील ४० घरफोड्यांची कबुली

चौकशी दरम्यान हमीदकडे भारतातील 93 लोकांचे मोबाईल क्रमांक सापडले, त्यात सोहेल अहमद याचाही समावेश आहे. सोहेल अहमदकडे तीस मोबाईल सीमकार्ड सापडले आहेत. दुबईतील हमीदच्या सहाय्याने भारतात हे रेल्वे तिकीटांचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला आसामच्या गुवाहटीमधून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशभरात आठ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. याच मोहिमेअंतर्गत औरंगाबादमधून सोहेल अहमदला अटक केले आहे.

या सर्व प्रकरणाचा कर्ता-धर्ता असलेल्या हमीद अशरफ याला यापूर्वी देखील अशाच गुन्ह्यांमध्ये रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. मात्र, या प्रकरणातून सुटका झाल्यानंतर त्याने दुबई येथे पलायन केले. तेथे गेल्यानंतर त्याने पुन्हा रेल्वेची वेबसाईट हॅक करायला सुरुवात केली. रेल्वेच्या तत्काळ कोट्यातील तिकिटे बुकिंग करण्याचे रॅकेट त्याने सुरू केले.

भारतात हे रॅकेट चालवणाऱ्या टोळीच्या म्होरक्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकांना टेक्स्ट मेसेज केला होता. 'माझ्यावर तुम्ही कारवाई केली तर माझे लग्न कसे होईल, त्यापेक्षा रेल्वेची वेबसाईट हॅकच होणार नाही, अशी व्यवस्था तुम्ही करायला हवी', असे या टेक्स्ट मॅसेजमध्ये म्हटले होते. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. औरंगाबादचे आणखी किती लोक अटक केलेल्या सोहेल अहमदच्या संपर्कात होते. सोहेलने ही लिंक आणखी किती लोकांना पुरवली, याचा पोलीस तपास करत आहेत.

Intro:रेल्वेची वेबसाइट हॅक करून तत्काळ तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटप्रकरणी औरंगाबादच्या बुढ्ढीलेन भागातून रेल्वे सुरक्षा बलाने आज एकाला अटक केली. सोहेल अहमद असे त्याचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील गौडा येथील रहिवासी आहे. दुबईतून वेबसाईट हॅक करणाऱ्या हमीद अशरफ याच्या तो संपर्कात होता. Body:गेल्या सहा वर्षांपासून तो औरंगाबादेत वास्तव्यास असून बुढ्ढीलेन भागात तो टेलरिंगचे काम करत होता. रेल्वेची बेवसाइट हॅक करून रेल्वेच्या तत्काळ आरक्षित तिकिटांचे काही मिनिटांत 85 टक्के बुकिंग करणारे रॅकेट दुबईतील हमीद असर्फ चालवत होता. सॉफ्टवेअरद्वारे रेल्वेची बेवसाइट हॅक करून जनरेट झालेली लिंक हमीद दुबईतून भारतातील त्याच्या संपर्कातील लोकांना पाठवत होता. Conclusion:हमीदकडे भारतातील ज्या 93 लोकांचे मोबाइल क्रमांक सापडले, त्यात सोहेल अहमद याचाही समावेश आहे. सोहेल अहमदकडे 30 मोबाइल सीमकार्ड सापडले आहेत. दुबईतील हमीदच्या साह्याने भारतात हे रॅकेट चालवणार्या टोळीच्या म्होरक्यास आसामच्या गुवाहटीमधून उचलल्यानंतर काल मध्यरात्रीपासून देशभरात 8 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. याच मोहिमेअंतर्गत औरंगाबादेतून सोहेल अहमदला उचलण्यात आले आहे. हमीद अशरफ याला यापूर्वी देखील अशाच गुन्ह्यांमध्ये रेल्वे पोलिसांनी अटक केली होती ती मात्र या प्रकरणातून सुटका झाल्यानंतर त्यांनी दुबई राखली आणि पुन्हा रेल्वे ची वेबसाईट हॅक करायला सुरुवात केली. रेल्वेच्या तत्काळ कोट्यातील आरक्षित तिकिटे बुकिंगचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीच्या म्होरक्याने रेल्वे सुरक्षा बलाच्या महासंचालकांना टेक्स्ट मेसेज केला. माझ्यावर तुम्ही कारवाई केली तर माझे लग्न कसे होईल, त्यापेक्षा रेल्वेची वेबसाइट हॅकच होणार नाही, अशी व्यवस्था तुम्ही करायला हवी, असे या टेक्स्ट मॅसेजमध्ये म्हटले होत. सोहेलच्या संपर्कात औरंगाबाद मधले आणखी किती लोक होते. सोहेलने ही लिंक आणखी किती लोकांना पुरवली याचा पोलिस तपास करत आहेत. तर खरोखरच दहशतवाद्यांना पैसा पुरवला जात होता का याची देखील चौकशी एटीएस करता आहे.
Byte - अरविंद शर्मा - रेल्वे पोलीस
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.