औरंगाबाद : ओझर गावातून एक धक्कादायक घटना घडली. नातवाने मुलगी पळवली म्हणून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली (Old Woman Stripped Naked And Beaten) आहे. ओझर गावातील ही घटना आहे. विवेक उर्फ चवल्या पिंपळे यांच्यासह 2 आरोपीने ही मारहाण केली. गंगापूर फाट्यावर ही पारधी समाजाची महिला राहते. तिच्या नातवाने आरोपीच्या मुलीला 1 तारखेला पळवून नेले म्हणून शोधण्यासाठी हा व्यक्ती गंगापूर फाट्यावर आला. त्याच्यासह दोन जणांनी ही मारहाण (grandson kidnapped daughter) केली. सदरील प्रकरणी रात्री गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
समाज माध्यमांवर व्हायरल : गंगापूर तालुक्यात एक संतापजनक प्रकार समोर आला असून, मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मारहाण करतानाचा व्हिडिओ तयार करून आरोपींकडून हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल देखील करण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात रविवारी मध्यरात्री तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (kidnapped daughter in Aurangabad) आहे.
मारहाण केल्याची घटना : पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील गंगापूर फाट्यावर असलेल्या पारधी वस्तीवर मारहाण झालेली वृद्ध महिला आपल्या नातवासोबत राहते. दरम्यान ओझर गावातील विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि त्याच्या साथीदारांनी पीडित वृद्ध महिलेलेला घरी जाऊन तुमच्या नातूने आमची मुलगी पळून नेल्याचा आरोप केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्या वृद्ध महिलेला आपल्यासोबत गंगापूर फाट्यावरून, आरोपींनी आपल्या घरी नेऊन मारहाण केल्याची घटना घडली (Old Woman Stripped Naked And Beaten in Aurangabad ) आहे.
गुन्हा दाखल : वृद्ध महिलेला ओझर येथील पारधी वस्तीवर आणल्यावर आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. संतापजनक म्हणजे महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिला नग्न करत मारहाण करण्यात आली. यावेळी पीडित वृद्ध महिला हात जोडत होती, दयेची भीक मागत होती. माझ्या मुलीला तुझ्या नातूने पळून नेले म्हणून, वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्या महिलेचा मारहाण करतानाचा व्हिडिओही केला. संतापजनक म्हणजे तयार केलेला व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरलसुद्धा केला. त्यामुळे अखेर यासगळ्या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.