औरंगाबाद - राज्यात कोरोना बाधिताची संख्या पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ( Schools Closed in Maharashtra Over Corona Patients Increasing ) यामुळे विद्यार्थ्यांना परत 'ऑनलाइन'च्या माध्यमातून शिक्षण घ्यावे लागत आहे. ( Online Education in Maharashtra ) या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण ( Marathwada Graduates Constituency MLA Satish Chavan ) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्याकडे केली आहे.
सर्व सुरू मग शाळा का बंद?
राज्यात सरकारने एकीकडे मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृह आदी ठिकाणे 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा दिली असताना शाळा, महाविद्यालये सरसकट बंद का? असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. शाळा बंद असल्याने मुले शिक्षणापासून तर दुरावली आहेतच. मात्र, त्याचबरोबर त्यांच्या लेखन, वाचन आणि ज्ञानग्रहण क्षमतेवर देखील विपरित परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मागील ‘लॉकडाऊन’मुळे ही मुले-मुली गावी गेल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडला. अनेक मुले शेतात काम करत आहेत तर अनेक मुलींचे बाल वयातच विवाह लावण्यात आले असल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा - शाळा संघटना आक्रमक, मेसाचा इशारा तर, शाळा सुरू केल्याचा मेस्टाचा दावा
एकीकडे बालविवाह रोखण्यासाठी शासकीय पातळीवर विविध उपाय योजना करायच्या आणि दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे कारण सांगून विद्यार्थ्यांचेच वसतीगृह यासाठी ताब्यात घ्यायचे. याचा देखील शासनाने आता गांभीर्यपूर्वक विचार करायला हवा. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता यापुढे किमान शाळा, महाविद्यालयांच्या इमारती तसेच वसतिगृह तरी कोरोना बाधितांसाठी ताब्यात घेण्यात येवू नयेत, असे आमदार सतीश चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
रुग्ण नसलेल्या गावात सुरू ठेवा शाळा -
खरे तर ग्रामीण भागातील जीकोरोना मुक्त गावं आहेत त्या ठिकाणी शाळा सुरू ठेवायला काहीच हरकत नाही. ‘रेड झोन’ किंवा महानगरपालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येईल का? याचा देखील शासनाने विचार करावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.