ETV Bharat / state

अजिंठ्यात मोहरमच्या निमित्ताने घडते हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

यावेळी सवारी सोबत ताजिया, बुराख बीबी, मिरवणुक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी ९ वाजता इंमाम वाड्यातून इमाम हुसेन सवारीने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी सवारीवर फुलांची चादर सवारीला लावण्यासाठी नागरिकांची धडपड चालली होती. हुसेनी मोहल्यातून दुपारनंतर सर्व सवाऱ्या गांधी चौकात एकत्र आल्यानंतर या सवारींची मिरवणूक काढण्यात आली.

अंजिठा येथे मोहरम सणादरम्यान निघालेली सवारी
author img

By

Published : Sep 10, 2019, 7:11 PM IST

Updated : Sep 12, 2019, 7:39 AM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील अजिंठा येथील मुस्लीम धर्मियांचा मोहरम सण हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला जातो. यावेळी सणादरम्यान अजिंठा येथे 57 सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले. ज्यामध्ये 6 सवाऱ्या हिंदू बांधवानी काढलेल्या होत्या. असा हा एकात्मतेचा संदेश देणाऱ्या मोहरम सण पाहण्यासाठी बऱ्हाणपुर, मालेगाव, मुंबई, नाशिक, धुळे, जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि अकोला इ. ठिकाणांहून नागरिक येतात.

अजिंठ्यात मोहरमच्या निमित्ताने घडते हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

हेही वाचा - विघ्नहर्ता तू एक तुझे रूप अनेक...

यावेळी सवारी सोबत ताजिया, बुराख बीबी, मिरवणुक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी ९ वाजता इंमाम वाड्यातून इमाम हुसेन सवारीने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती. यावेळी सवारीवर फुलांची चादर सवारीला लावण्यासाठी नागरिकांची धडपड चालली होती. हुसेनी मोहल्यातून दुपारनंतर सर्व सवाऱ्या गांधी चौकात एकत्र आल्यानंतर या सवारींची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पाहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यानंतर पावणे गांधी चौकातून सर्व सवाऱ्या विसर्जनासाठी एकत्र येऊन मिरवणुक वेगाने पुढे सरकली.

हेही वाचा - पारंपरिक सणांचा रंग बदलतोय; बैलांऐवजी ट्रॅक्टर पोळा

डोंगरात असलेल्या लेण्यांमुळे अजिंठ्याला जागतिक ऐतिहासिक वारसा असे महत्व प्राप्त झाले आहे. अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना देखील मोहरमच्या निमित्ताने काढलेल्या सवाऱ्यांमूळे वेगळी संस्कृती अनुभवायला मिळते. खरतर मुस्लिम बांधवांसाठी आज दुःखाचा दिवस असतो आणि या दिवशी हिंदू बांधवदेखील त्यांच्या या दु:खामध्ये सहभागी होऊन सवाऱ्या काढतात. असा अनोखा योग बहुदा अजिंठा येथेच पाहायला मिळतो. येथे या हुसेन, या हुसेन अशा घोषणा, सरबताचे वाटप आणि सवारी दर्शनासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात मिरवणूक मार्गस्थ होते.

हेही वाचा - 'या' बाप्पाच्या भक्ताच्या नावावर आहे 'लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड'

Intro:औरंगाबादच्या अजिंठा येथील मोहरम हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला जातो. अजिंठा येथे 57 सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले. ज्यामध्ये 6 सवऱ्या हिंदू बांधवानी काढलेल्या होत्या. एकात्मतेचा संदेश देणाऱ्या मोहरम पाहण्यासाठी बराणपुर, मालेगाव, मुंबई, नाशिक, धुळे, जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि अकोला येथून नागरीक येतात.Body:डोंगरात असलेल्या लेण्यांमुळे अजिंठ्याला जागतिक ऐतिहसिक वारसा अस महत्व प्राप्त आहे. अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना देखील मोहरमच्या निमित्ताने काढलेल्या सवाऱ्यांमूळे वेगळी संस्कृती अनुभवायला मिळते. खरतर मुस्लिम बांधवांसाठी आजचा दुःखाचा दिवस, मात्र या दिवशी हिंदू बांधव देखील सवऱ्या काढतात. असा अनोखा योग बहुदा अजिंठा येथेच पाहायला मिळतो.
Conclusion:अजिंठा येथे या हुसेन, या हुसेन अशा घोषणा. सरबताचे वाटप आणि सवारी दर्शनासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात मिरवणूक मार्गस्थ होते. सवारी सोबत ताजिया, बुराख बीबी, मिरवणुक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.
सकाळी ९ वाजता इंमाम वाड्यातून इमाम हुसेन सवारीने विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती. यावेळी सवारीवर फुलांची चादर सवारीला लावण्यासाठी नागरिकांची धडपड चालली होती. हुसेनी मुहल्यातून दुपारनंतर सर्व सवाऱ्या गांधी चौकात एकत्र येऊन सवारीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूक पाहाण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यानंतर पावणे गांधी चौकातून सर्व सवाऱ्या विसर्जनासाठी एकत्र येऊन मिरवणुक वेगाने पुढे सरकली.
Last Updated : Sep 12, 2019, 7:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.