औरंगाबाद (कन्नड)- वडनेर येथील ३२ वर्षीय महिलेस २२ तारखेला सकाळी शेतात बोलावून तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. आशाबाई शेषराव गांगुर्डे, असे खून झालेल्या महिलेचे नाव असून या प्रकरणी तीन आरोपींना ग्रामीण पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून न्यायलयासमोर हजर केले. न्यायलयाने आरोपीना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गावातील काही महिलांना कामावरुन परत येत होत्या. तेव्हा त्यांना स्वप्नील राठोड यांच्या शेतात आशाबाई ह्या जखमी अवस्थेत पडलेल्या दिसल्या. त्यानंतर शेषराव गांगुर्डे यांनी शेतात जाऊन पाहिले असता तेथे आशाबाई रक्तबंबाळ अवस्थेत मृत होऊन पडलेल्या होत्या. त्यानंतर गांगुर्डे यांनी याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मदत घेवून तपास केला. हा गुन्हा रवी बाळू वाघ याने विशाल रमेश पवार (वय १९) याच्या मदतीने केल्याचे चौकशीत समोर आले. त्यांनी यात एकाअल्पवयी आरोपीने ही मदत केली. पोलिसांनी आरोपीना न्यायलयासमोर हजर केले असता त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
अनैतिक संबधातून ही हत्या झाल्याचेही चौकशीत समोर आले आहे. आरोपी रवी याला आपल्या वडिलांचे आणि मृत आशाबाईंचे अनैतिक संबध असल्याचा संशय होता. त्यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. कुऱ्हाड व कोयत्याने डोक्यावर, चेहऱ्यावर, छातीवर, हातावर वार करुन खुन केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे.