ETV Bharat / state

संततधारेमुळे शेतकरी अडचणीत; मूग, कांदा पिकांचे नुकसान - onion crop damage news

ऑगस्ट महिन्यात सलग २० दिवस पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ऐन काढणीला पाऊस आल्याने मूग पिकाचे आतोनात नुकसान झाले. याशिवाय कांदा पिकाचेही नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Mung and onion crop damage due to heavy rain in aurangabad
सलग झालेल्या पावसाने शेतकरी अडचणीत; मूग, कांदा पीकाचे नुकसान
author img

By

Published : Aug 24, 2020, 4:11 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये यंदा पहिल्यांदाच सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात सलग २० दिवस पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ऐन काढणीला पाऊस आल्याने मूग पिकाचे आतोनात नुकसान झाले. याशिवाय कांदा पिकाचेही नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

सद्यपरिस्थितीत मूग काढणीला आला आहे. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळे तो काढणे शक्य नाही. जास्तीच्या पावसामुळे शेंगा ओल्या झाल्या आणि शेंगामधील मुगाला कोंब फुटू लागले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेंगा झाडावरच खराब झाल्या. खराब झालेले हे पीक शेतकरी काढून टाकत आहेत. अशा शेंगा जनावरांना देखील खाण्यास योग्य नाहीत, अशी माहिती पळशी गावचे शेतकरी अनिल पळसकर आणि सोमनाथ पळसकर यांनी दिली.

नुकसान झालेल्या शेतकऱ्याशी संवाद साधताना आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे....

एकेकाळी कांद्याचे विक्रमी उत्पन्न घेणाऱ्या पळशी गावात यंदा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांदा उगवण्याची वेळी जोरदार सतत पडणाऱ्या पावसाने कांद्याची वाढ थांबली. एका एकरामध्ये पन्नास क्विंटलच्यावर येणारा कांदा यावेळी पाच क्विंटल कांदा देखील झाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यामधून होत आहे.

हेही वाचा - आता औरंगाबादेत बसने प्रवास करून येणाऱ्या नागरिकांची अँटीजेन तपासणी

हेही वाचा - औरंगाबाद : गुन्हे शाखेने आवळल्या दोन दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.