ETV Bharat / state

बुरखाबंदीची शिवसेनेची मागणी म्हणजे स्टंटबाजी, मुस्लिम महिलांचा आरोप - saaamana

बुरखा घालण्याचे आदेश आम्हाला अल्लाहने दिले असून भारताच्या संविधानाने देखील आम्हाला बुरखा घालण्याची परवानगी दिली आहे. बुरखा आम्ही आमच्या सुरक्षेसाठी वापरतो. घराच्या बाहेर पडत असताना कोणाची वाईट दृष्टी आमच्यावर पडायला नको म्हणून बुरखा आम्ही घालतो.

बुरखाबंदीची शिवसेनेची मागणी म्हणजे स्टंटबाजी
author img

By

Published : May 1, 2019, 5:01 PM IST

औरंगाबाद - श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर त्या ठिकाणी बुरखा बंदी आणण्याच्या हालचालीला वेग आला आहे. त्याच धर्तीवर भारतातदेखील बुरखा बंदी करण्याची मागणी शिवसेनेने केली. या मागणीनंतर मात्र देशातील मुस्लिम महिलांनी शिवसेनेची मागणी राजकीय स्टंट असल्याचा आरोप केलाय.
बुरखा घालण्याचा अधिकार शरीयत आणि भारताच्या संविधानाने दिला आहे. तसेच मुस्लिम महिला स्वतःच्या सुरक्षेसाठी बुरखा परिधान करतात. त्याला कोणी आडकाठी करू नये, असा इशारा मुस्लिम महिलांनी औरंगाबादेत दिला.


श्रीलंकेत एकाच दिवशी लागोपाठ झालेल्या बॉम्बस्फोटात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. श्रीलंकेत आणीबाणी सुरू करण्यात आली. त्याचबरोबर देशात बुरखा बंदी आणण्यासाठी हालचालींना वेग येऊ लागला. श्रीलंकेतील बुरखा बंदीचा जगभरातील अनेक देशांनी समर्थन केले. तर काही देशांनी याचा विरोध देखील केला. बुरखाबंदीच्या या निर्णयाचे शिवसेनेनेही स्वागत केले आहे.

फिरदोस फातेमा - सामाजिक कार्यकर्त्या


श्रीलंकेच्या धर्तीवर भारतात देखील बुरखाबंदी करा अशी मागणी सामना या मुखपत्राच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या मागणीनंतर मुस्लिम महिलांनी संताप व्यक्त केला. बुरखाबंदीची मागणी करून काही लोक राजकारण करत आहेत. बुरखाबंदी असेल अतिरेकीच्या नावावर काही लोक मुस्लिम समाजाला लक्ष्य करत असल्याचा आरोप औरंगाबादच्या मुस्लिम महिलांनी केला आहे.


बुरखा घालण्याचे आदेश आम्हाला अल्लाहने दिले असून भारताच्या संविधानाने देखील आम्हाला बुरखा घालण्याची परवानगी दिली आहे. बुरखा आम्ही आमच्या सुरक्षेसाठी वापरतो. घराच्या बाहेर पडत असताना कोणाची वाईट दृष्टी आमच्यावर पडायला नको म्हणून बुरखा आम्ही घालतो. गेल्या काही वर्षात देशात महिला सुरक्षित नाहीत. बऱ्याच महिला आता अर्धा बुरखा म्हणजेच स्कार्फ बांधूनच बाहेर पडतात. लोकांच्या वाईट दृष्टीपासून वाचण्यासाठी सर्वच महिलांनी बुरखा वापरायला हरकत नसल्याचेही मत औरंगाबादच्या मुस्लिम महिलांनी व्यक्त केले.

Intro:श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब ब्लास्ट नंतर बुरखा बंदी आणण्याच्या हालचालीला वेग आलाय. त्याच धर्तीवर भारतात देखील बुरखा बंदी करण्याची मागणी शिवसेनेने केली. या मागणीनंतर मात्र देशातील मुस्लिम महिलांनी शिवसेनेची मागणी राजकीय स्टेण्ट असल्याचा आरोप केलाय. Body:बुरखा घालण्याचा अधिकार शर्यतने आणि भारताच्या संविधानाने दिला असून महिला स्वतःच्या सुरक्षेसाठी बुरखा परिधान करत असल्याने भारतीय महिला बुरखा घालतील त्याला कोणी आडकाठी करू नये असा इशारा मुस्लिम महिलांनी औरंगाबादेत दिला. Conclusion:श्रीलंकेत एकाच दिवशी लागोपाठ झालेल्या बॉम्बस्फोटात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. श्रीलंकेत आणीबाणी सुरु करण्यात आली. त्याचबरोबर देशात बुरखा बंदी आणण्यासाठी हालचालींना वेग येऊ लागला. जगभरातून अनेक देशांनी समर्थन केले तर काही देशांनी याचा विरोध देखील केला. बुरखाबंदीच्या या निर्णयाचं शिवसेनेने स्वागत केले. श्रीलंकेच्या धर्तीवर भारतात देखील बुरखा बंदीकरा अशी मागणी सामना वृत्तपत्राच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. शिवसेनेच्या या मागणीनंतर मुस्लिम महिलांनी संताप व्यक्त केला. बुरखाबंदीची मागणी करून काही लोक राजकारण करत आहेत. बुरखाबंदी असेल अतिरेकीच्या नावावर काही लोक मुस्लिम समाजाला लक्ष करत असल्याचा आरोप औरंगाबादच्या मुस्लिम महिलांनी केलाय. बुरखा घालण्याचे आदेश अल्लाहने आम्हाला दिले असून भारताच्या संविधानाने देखील आम्हाला बुरखा घालण्याची परवानगी दिली आहे. बुरखा आम्ही आमच्या सुरक्षेसाठी वापरतो. घराच्या बाहेर पडत असताना कोणाची वाईट दृष्ट आमच्यावर पडायला नको म्हणून बुरखा आम्ही घालतो. गेल्या काही वर्षात देशात महिला सुरक्षित नाहीत. बऱ्याच महिला आता अर्धाबुरखा म्हणजेच स्कार्फ बांधूनच बाहेर पडतात. लोकांच्या बाईट दृष्टीपासून वाचण्यासाठी सर्व महिलांनीच बुरखा वापरायला हरकत नाही असं मत औरंगाबादच्या मुस्लिम महिलांनी व्यक्त केलं.
Byte - फिरदोस फातेमा - सामाजिक कार्यकर्त्या

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.