पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) आयुष्यातील प्रसंगांची आजच्या काळातील सर्व सामान्यांचा आव्हानांशी घातलेली सांगड विशाल गायकवाड यांच्या 'मुद्रा भद्राय राजते' पुस्तकाचं वेगळेपण अधोरखित करते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (former Chief Minister Prithviraj Chavan) यांनी केले. पुणे येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी अधिवेशन प्रसंगी बुधवारी रोजी गंगापूर तालुक्यातील नाटककार, व्याख्याते तथा लेखक विशाल गायकवाड यांनी लिहिलेल्या 'मुद्रा भद्राय राजते' या पुस्तकाच्या प्रकाशन (Mudra Bhadray Rajte book released) सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील,संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, अभिनेते भरत जाधव, अशोक समर्थ, लेखक अरविंद जगताप तसेच पुस्तकाचे लेखक विशाल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवराय सोबत असल्याची जाणीव : पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, वाचकांनी या पुस्तकाकडून मोठ्या अपेक्षा ठेवायला हरकत नाही. सर्वच क्षेत्रात काम करत असताना निरनिराळी आव्हाने येत असतात. त्या सर्वांना हे पुस्तक शिवराय सोबत असल्याचा अनुभव देईल, पुस्तकात घटना निहाय केलेली मांडणी गुंतवून ठेवणारी आहे.'अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला' या भूमिकेला समर्पक मांडणी पुस्तकातून केल्याने विद्यार्थ्यांपासून शेतकरी, उद्योजक, व्यापारी, शिक्षक पालक, राजकारणी सर्वांसाठी हे पुस्तक फायद्याचे ठरणार असल्याचे समाधान संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले. पुस्तकाचे लेखक विशाल गायकवाड यांनी शिवकालीन प्रेरणादायी संदर्भाची आजच्या आधुनिक स्पर्धेच्या युगातील आव्हानांसोबत वाचकांनी सांगड घालून उकल करण्यासाठी केलेला लेखन प्रपंच म्हणजे 'मुद्रा भद्राय राजते' असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले. पुस्तकाचे लेखक विशाल गायकवाड यांचा याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुस्तक प्रकाशन सोहळा : यावेळी राजेंद्र सरोवर,डॉ.उद्धवराजे काळे पाटील,अविनाश गायकवाड,डॉ.रणजित गायकवाड,प्रा. मनोज बनगाळे,वर्षा विशाल गायकवाड, जयेश निरपळ, योगेश शेळके, संतोष भिंगारे आदी हजर होते.शिवराय घराघरापर्यंत त्यांच्या शिवनितीसह पोहचवण्याचा हा प्रयत्न आज यशस्वी होताना दिसतोय यासारखा दुसरा आनंद नाही , असे लेखक विशाल गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
मुद्रा भद्राय राजते : छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षाची कथा या पुस्तकात लेखकांनी मांडण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे. तसेच छत्रपती शिवरायांच्या संघर्षाची आपल्या व्यक्तिगत संघर्षाशी तुलना करून त्यातून बाहेर पडण्यासाठी मुद्रा भद्राय राजते हे पुस्तक असल्याचे सांगितले जाते.