ETV Bharat / state

औरंगाबादेत खासदार जलील यांची विजयी रॅली; हजारो लिटर पाण्याची नासाडी - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

शहरातील जुन्या भागात मिरवणूक काढत असताना एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी पाण्यात रंग टाकून टँकरमधील पाणी लोकांवर टाकत पाण्याची नासाडी केली.

औरंगाबादेत खासदार जलील यांची विजयी रॅली, हजारो लिटर पाण्याची नासाडी
author img

By

Published : Jul 29, 2019, 8:30 PM IST

औरंगाबाद - नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या विजयी मिरवणुकीत पाण्याचा अपव्यय झाल्याचे समोर आले आहे. शहरातील जुन्या भागात मिरवणूक काढत असताना एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी पाण्यात रंग टाकून टँकरमधील पाणी लोकांवर टाकत पाण्याची नासाडी केली. या कृतीमुळे विरोधकांनी जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

MIMच्या विजयी रॅलीत पाण्याची नासाडी

ऐन पावसाळ्यात दुष्काळाची झळ औरंगाबादकरांना बसत आहे. शहराववर टँकरने विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. अशामध्ये एमआयएमकडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय करण्यात आला. याबरोबरच ज्या खासदाराच्या विजयी रॅलीत पाण्याचा अपव्यय करण्यात आला. त्याच खासदाराने लोकसभेत औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांची दुटप्पी भूमिका दिसून येत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

औरंगाबाद लोकसभा निवडनुकीमध्ये एमआयएमने राज्यातले आपले खाते उघडले. इमतियाज जलील खासदार म्हणून निवडून आले. या विजयाचा जल्लोष एमआयएम कार्यकर्त्यांनी 2 महिन्यांनी साजरा केला. मात्र, विजय जल्लोष साजरा करताना त्यांनी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केली. पाण्याच्या टँकरमध्ये हिरवा, निळा रंग मिसळून ते पाणी मिरवणुकीतील सहभागी झालेल्या लोकांवर टाकण्यात आले.

त्यामुळे आता लोकांना या खासदाराचा खरा चेहरा दिसून येत असल्याचा आरोप माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तसेच विजयी मिरवणुकीत वापरलेले टँकर महानगरपालिकेचे असतील, तर त्याची त्वरित चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केले आहे.

Intro:औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या विजयी मिरवणुकीत पाण्याचा अपव्यय झाल्याचं समोर आलं। शहरातील जुन्या भागात मिरवणूक काढत असताना एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी पाण्यात रंग टाकून टॅंकरने ते पाणी लोकांवर टाकून पाण्याची नासाडी केल्याचं दिसून आलं. या कृतीनंतर आता विरोधकांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.Body:दुष्काळाची झळ औरंगाबादकरांना बसत आहे, ऐन पावसाळ्यात टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ औरंगाबादच्या रहिवाशांवर येत आहे. अशामध्ये पाण्याचा अपव्यय करण्यात येतोय. ज्या खासदारांचा विजय जल्लोष साजरा करत होते त्यात खासदारांनी लोकसभेत औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांची दुटप्पी भूमिका दिसून येत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे.
Conclusion:दोन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात लक्षवेधी निवडणूक राहिली ती औरंगाबादची. औरंगाबादमध्ये एमआयएम पक्षाने राज्यातलं आपलं खातं उघडलं. इमतियाज जलील खासदार म्हणून निवडून आले. या विजयाचा जल्लोष एमआयएम कार्यकर्त्यांनी दोन महिन्यांनी साजरा केला. मात्र विजय जल्लोष साजरा करत असताना काढलेल्या मिरवणुकीत पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात केली गेली. पाण्याचे टँकर बोलून त्या पाण्यात हिरवा निळा असे रंग टाकून ते पाणी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांवर टाकण्यात आले. खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला होता. इतकंच नाही तर पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. संवेदनशील खासदार अशी ओळख त्यांची निर्माण होत होती. मात्र त्यांच्याच विजयी मिरवणुकीत पाण्याची नासाडी झाल्याने खासदार करतात एक आणि वागतात एक असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. आता लोकांना या खासदाराचा खरा चेहरा दिसून येत असल्याचा आरोप माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलाय. विजयी मिरवणुकीत पाण्याचे टँकरने पाणी फवारून पाण्याचा अपव्यय करण्यात आला. यासाठी वापरलेले टॅंकर महानगरपालिकेचे असले तर त्याची त्वरित चौकशी करून कारवाई करणार असल्याचे मत महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केल.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.