ETV Bharat / state

MP Imtiaz Jaleel : नामांतर केलं आता आमची लढाई सुरू, वकिलांशी चर्चा करून निर्णय घेऊ - खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा - इम्तियाज जलील

MP Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून माध्यमांशी बोलताना खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. नामांतर केलं आता आमची लढाई सुरू राहणार आहे, असा इशारा त्यांनी दिलाय. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

MP Imtiaz Jaleel
खासदार इम्तियाज जलील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 10:19 PM IST

खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) MP Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून अनेक याचिका न्यायालयामध्ये दाखल आहेत, असं असताना मराठवाड्याच्या विकासासाठी कॅबिनेटची बैठक झाल्यावर तुम्ही महागाई, विकास, रस्ते, पाणी याबद्दल बोलले नाही. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही घाणेरडे राजकारण करण्यासाठी या ठिकाणी आले होते. या ठिकाणी शहराचं नाव बदललं आहे. तुमची अपेक्षा ही होती की, आम्ही गुपचूप बसून ते नामांतर स्वीकारू. मात्र, आम्ही सुरुवातीपासून विरोध केला आहे. हा विरोध आमचा कायम असणार आहे, अशी भूमिका खासदार इम्तियाज जलील यांनी मांडलीय. (Chhatrapati Sambhaji Nagar Renaming)

औरंगाबाद आमची ओळख : आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना विरोध करत नाही, मी महापुरुषांचा आदर करतो. मात्र, औरंगाबाद नाव ही एक ओळख आहे. जगामध्ये औरंगाबाद नावाचा लौकिक आहे. मात्र तुमचं राजकारण घाणेरडं आहे. तुम्ही हे मुद्दे वारंवार आणता. खुर्ची दूर होत असताना तुम्ही हे मुद्दे आणून भावनिक मुद्द्यांवर वातावरण निर्मिती करत आहात. नामांतराच्या बाबतीत न्यायालयामध्ये पिटीशन दाखल करण्यात आलेल्या आहेत. याबद्दल कोर्टानं अनेकवेळा महत्त्वाचा मुद्दा नाही, म्हणून त्याला पुढची तारीख वाढवून दिलीय. हे मात्र विकासाच्या नावावर मराठवाड्यात आले. इथे येऊन नामांतर केलंय. मात्र, यांनी शहराध्ये येऊन नागरिकांना धोका दिलाय, अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केलीय. (Chhatrapati Sambhaji Nagar news)

वेळ आली तर रस्त्यावर उतरणार : लोकांमध्ये रोष आहे. कुठं काही झालं तर तुम्ही मला जबाबदार धराल, मी त्यांना थांबवलंय. आपल्याला शांततापूर्ण मार्गानं नामांतराला विरोध करायचा आहे. शहरामध्ये एवढे सगळे मंत्री फिरत आहेत, कुठे काही झालं तर कोण जबाबदार? यामुळे मी म्हणत आहे की, पंचतारांकित हॉटेल तुमच्यासाठी बुक केलंय. त्या ठिकाणी तुम्ही जेवण वगैरे करा आणि आरामात राहा. कोर्टाची जी लढाई आहे, ती आमची लढाई सुरूच राहणार आहे. आम्हाला रस्त्यावर येण्याची आवश्यकता आहे का? याबाबतीत आम्ही लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक यासाठी येतील, असं वाटत नाही. त्या लोकांसाठी शहराच्या नावापेक्षा त्यांचं पद महत्त्वाचं आहे. पण मी माझी जबाबदारी म्हणून सर्वांना निमंत्रित करतो. आता न्यायालयीन लढाई सुरू आहे, ही सुरूच राहणार आहे. वकिलांशी चर्चा करून अजून निर्णय घेऊ, असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिलाय. (Jaleel on Chhatrapati Sambhaji Nagar Renaming)

हेही वाचा :

  1. Renaming Aurangabad: बिहारमध्ये औरंगाबाद नाव भाजपसाठी योग्य आहे, मग महाराष्ट्रात का नाही? इम्तियाज जलील यांचा सवाल
  2. Asaduddin Owaisi attend Iftar party : खासदार जलील यांच्या इफ्तार पार्टीला असदुद्दीन ओवैसींची हजेरी
  3. आम्हाला सोबत घेऊन रिक्षाची कार करा, खासदार इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.