औरंगाबाद - राज्यात धार्मिक स्थळ आजपासून सुरू करण्यात आली. यावेळी भाजपाकडून जल्लोष साजरा करत असताना या सरकारला शनी मागे लागून सरकार पडेल, असे विधान खासदार डॉ. भागवत कराड यांनी केले. तर दुसरीकडे दारू दुकान सर्रास खुली असताना मंदिरात जाण्यासाठी नियम का? असा प्रश्न आमदार अतुल सावे यांनी उपस्थित केला.
राज्यातील धार्मिक स्थळ आजपासून सुरू करण्यात आल्याने भाजपाने राज्यभर मंदिर परिसरात जल्लोष केला. औरंगाबादच्या सुपारी मारोती मंदिर परिसरात भाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आरती करून जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेठे भरवत जयघोष केला. औरंगाबादच्या जल्लोषात खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, अमृता पालोदकर, माधुरी आदवंत यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
'महाविकास आघाडी सरकारच्या मागे शनी लागून सरकार पडेल' - अतुल सावे न्यूज
राज्य सरकारने आजपासून मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली असून याचा जल्लोष भाजपाने केला. यावेळी या सरकारच्या मागे शनी लागून सरकार पडेल, असे विधान खासदार डॉ. भागवत कराड यांनी केले.
औरंगाबाद - राज्यात धार्मिक स्थळ आजपासून सुरू करण्यात आली. यावेळी भाजपाकडून जल्लोष साजरा करत असताना या सरकारला शनी मागे लागून सरकार पडेल, असे विधान खासदार डॉ. भागवत कराड यांनी केले. तर दुसरीकडे दारू दुकान सर्रास खुली असताना मंदिरात जाण्यासाठी नियम का? असा प्रश्न आमदार अतुल सावे यांनी उपस्थित केला.
राज्यातील धार्मिक स्थळ आजपासून सुरू करण्यात आल्याने भाजपाने राज्यभर मंदिर परिसरात जल्लोष केला. औरंगाबादच्या सुपारी मारोती मंदिर परिसरात भाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आरती करून जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेठे भरवत जयघोष केला. औरंगाबादच्या जल्लोषात खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर, अमृता पालोदकर, माधुरी आदवंत यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
TAGGED:
अतुल सावे न्यूज