छत्रपती संभाजीनगर Sanjay Shirsat : मंत्रिमंडळ विस्तार जयंत पाटील यांच्यामुळं रखडलेला होता, असा खळबळ जनक खुलासा शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार, संजय शिरसाट यांनी केलाय. जयंत पाटील, अजित पवारांसोबत येणार होते. तसा प्रस्ताव त्यांनी पुण्यात दिला होता. तेच शरद पवार यांना याबाबत सांगणार होते. त्या बैठकीला सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. जयंत पाटील शरीरानं तिकडं आहेत, मात्र मनानं ते इकडं आहेत. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे मित्र आहेत, त्यांनी उगाच डायलॉगबाजी करू नये, हे आपलं क्षेत्र नाही, असा सल्ला शिरसाट यांनी दिलाय.
संजय राऊतांवर बोलल्यावर तोंड घाण होतं : सध्या राज्यात डीप क्लीनवरून राजकारण तापलं आहे. त्यावर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्यातील जनता भाजपाला क्लीन करेल, असा टोला लगावला आहे. त्यावर बोलताना आम्हाला डीप क्लीन करून घ्यायची आहे. आम्ही स्वच्छ होऊ, मात्र जे तुंबलेले आहेत त्यांचं खरं क्लीन होणार आहे. संजय राऊतांवर बोलून तोंड घाण होतं, सरतं वर्ष आहे चांगलं करू, महाराष्ट्र सोन्यानं मढलेला आहे, मात्र, राऊत आंधळे आहेत त्यांना दिसत नाही. महाराष्ट्र संपन्न राज्य आहे. राऊत रेव्ह पार्टीबाबत बोलतात. सध्या त्यांना पार्टीमध्ये जाण्याची अडचण झाली असेल, असा टोला शिरसाट यांनी लगावलाय.
प्रकाश आंबेडकर प्रगल्भ नेते : प्रकाश आंबेडकर प्रगल्भ आहेत, त्यांना कळतं कुणाला भेटायचं. सध्या प्रकल्प बाहेर गेले, अशी टीका केली जात आहे. मात्र, पाणबुडी उद्योग गुजरातला गेला, हे अजून निश्चित नाही, मात्र महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगांची कुणी चर्चा करत नाही. असंच हिरे उद्योगाबाबत झालं, सरकार पाणबुडी उद्योग जाऊ देणार नाही. उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणार नसल्याचंही शिरसाट यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा -