ETV Bharat / state

आमदार इम्तियाज जलील यांचा कार्यकर्त्यांसह गुटखा गोडाऊनवर छापा - aurangabad

बालाजी नगर भागात साठवून ठेवलेल्या गुटखा गोडाऊनवर एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी छापा टाकला.

आमदार इम्तियाज जलील
author img

By

Published : Feb 21, 2019, 7:02 PM IST

औरंगाबाद - शहरातील बालाजी नगर भागात साठवून ठेवलेल्या गुटखा गोडाऊनवर एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी छापा टाकला. गेल्या काही महिन्यांपासून आमदार जलील यांनी शहरातील अवैध गुटका व्यापार बंद करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी अवैध गुटका विक्री बंद होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, आश्वासन फोल ठरल्याने इम्तियाज यांनी स्वतः कार्यकर्त्यांसह छापा मारला.

आमदार इम्तियाज जलील

राज्यात गुटका बंदी झाली असली तरी, अनेक ठिकाणी अवैध गुटका विक्री उघडपणे केली जात आहे. औरंगाबादमधील बालाजी नगर येथे भर वस्तीत साठवून ठेवलेल्या गुटख्याच्या अड्ड्यावर एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी छापा टाकला. छापा मारल्यावर पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी माल जप्त केला आहे.

पोलीस हप्तेखोरीसाठी शहरात अवैध धंदे करू देत असल्याचा आरोप आमदार जलील यांनी यावेळी केला आहे. हप्ता न घेता शहरातील गुटखा विक्री थांबवा अथवा येणाऱ्या काळात भीक मागून पोलिसांना हप्ता पुरवू, इतकेच नाही तर अधिवेशनात या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचेही जलील म्हणाले.

Intro:औरंगाबादच्या बाजाली नगर भागात सुरू असलेल्या गुटखा गोडाऊनवर एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी छापा टाकला.

Body:गेल्या काही महिन्यांपासून एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी शहरातील अवैध गुटका व्यापार बंद करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी आश्वासन देऊन अवैध गुटका विक्री बंद होईल असं आश्वासन दिलं मात्र आश्वासन फोल ठरल्याने इम्तियाज यांनी स्वतः छापा मारला.

Conclusion:राज्यात गुटका बंदी झालीनसली तरी अनेक ठिकाणी अवैध गुटका विक्री उघड पणे केली जात आहे. औरंगाबादच्या बालाजी नगर येथेंभर वस्तीत असलेला गुटख्याच्या अड्डा एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी उघड केला. या गोडाऊन मधे मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या साठा असल्याचं उघड झाले. अनेक महिन्यांपासून एमआयएम पक्षाने अवैध गुटखा विक्री बंद करण्याची मागणी केली इतकंच नाही तर नशा मुक्ती अभियान अंतर्गत मोर्चा देखील काढण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र पोलिसांनी अवैध गुटखा बंद करण्याच आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आल. मात्र आश्वासन देऊनही अवैध गुटका विक्री सुरू असल्याने आमदार इम्तियाज जलील यांनी स्वतः कार्यकर्त्यांना घेत गोडाऊनवर छापा मारला. छापा मारल्यावर पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सदरील माल जप्त केलाय. कारवाई नंतर किती मुद्देमाल आहे ते स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं.

बाईट - राहुल खाडे - पोलीस उपायुक्त

आमदार इम्तियाज जलील यांनी मात्र पोलीस हप्तेखोरीसाठी शहरात अवैध धंदे करू देत असल्याचा आरोप केलाय. लवकर गुटखा व्यापरबथांबला नाही तर येणाऱ्या काळात भीक मागून पोलिसांना हप्ता पुरवू इतकंच नाही तर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना जाब विचारू अस इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केलं.

बाईट - इम्तियाज जलील - आमदार

गुटखा बंदी करणे ही तशी पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासनाचे काम, मात्र ते आपलं काम व्यवस्थित करत नसल्याने आमदाराला पुढाकार घ्यावा लागतोय अस मत एमआयएमने व्यक्त केलं असल तरी, आता औरंगाबाद पोलीस उघडपणे सुरू असलेला गोरख धंदा बंद करेल का हेच पाहण्यासारखं असेल.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.