ETV Bharat / state

Minor Girls Abuse Cases : कोरोनानंतर अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ; पालकांनो राहा सावध - minor girls abuse cases increased

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ (minor girls abuse cases increased) झाली असून वर्षाला पाच हजार घटनांची नोंद होत असल्याची माहिती महिला बाल कल्याण समिती अध्यक्ष (Women Child Welfare Committee President) आशा शेरखाने-कटके यांनी दिली. Latest news from Aurangabad

minor girl rape
अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ
author img

By

Published : Nov 18, 2022, 4:14 PM IST

Updated : Nov 18, 2022, 5:06 PM IST

औरंगाबाद : कोरोना संपला, मात्र त्यानंतर बरेच बदल झाले. काही सकारात्मक तर काही नकारात्मक असे अनेकांचे जीवन झाले. यामधे एक धक्कादायक वास्तव समोर आले. ते म्हणजे अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ (minor girls abuse cases increased) झाली असून वर्षाला पाच हजार घटनांची नोंद होत असल्याची माहिती महिला बाल कल्याण समिती अध्यक्ष (Women Child Welfare Committee President) आशा शेरखाने-कटके यांनी दिली. Latest news from Aurangabad

अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांविषयी बोलताना

अल्पवयीन मुलींवर वाढले अत्याचार - मागील दीड वर्षात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाल्याचे एका अहवालात समोर आल आहे. त्याची वेगवेगळी कारण आहेत, धक्कादायक वास्तव म्हणजे अल्पवयीन मुलींचे गर्भवती राहण्याचे प्रमाण चिंतेची बाब मानली जात आहे. कोरोना काळानंतर अनेक मुली शिक्षणापासून दूर झाल्या आहेत. घरची आर्थिक परिस्थिती त्याला कारणीभूत मानली जात आहे. एकट्या राहणाऱ्या मुली या जवळच्या नातेवाईक मित्रपरिवार यांच्या जाळ्यात अडकतात आणि त्यातूनच त्यांचं लैंगिक शोषण केलं जात आहे. मात्र आपली अब्रू जाईल किंवा अत्याचार करणारे जवळचे असल्याने या घटना समोर येत नाहीत असे देखील अभ्यासकांनी सांगितलं.

फूस लाऊन पळवून नेण्याचे प्रमाण वाढले - आधुनिक जगात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला त्यामुळे जीवनशैली पूर्णतः बदलली आहे. कोरोना काळात अभ्यास करण्यासाठी मुलांच्या हातात देण्यात आलेला मोबाईल आता मनोरंजनाच एक साहित्य झालाय. मात्र यातही त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात निष्पन्न झालेत. आई आणि वडील दोघेही नोकरीला असणाऱ्या घरात मुलं मोबाईलचा सर्रास वापर करतात. त्यातून सोशल साईट द्वारे मुलं अनेकांच्या संपर्कात येतात. अशावेळी त्यांच्यासोबत बोलताना भावनिक आधार घेत. काही लोक मुलींच्या जवळ जातात. त्यानंतर त्यांना आमिष दाखवून अथवा फुस लावून त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. अशात अनेक अल्पवयीन मुलींना फुस लाऊन पळवून नेल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं धक्कादाय वास्तव समोर आला आहे.

मुलींची घ्या काळजी - अशा घटना थांबवण्यासाठी मुलींमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ऍड आशा शेरखाने - कटके यांनी व्यक्त केल आहे. ज्यावेळेस मुलं घरी एकटे असतात तेव्हा आसपास असलेल्या विश्वासू व्यक्तींना त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यास सांगितलं पाहिजे. आपली मुलं अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात तर नाही आली ना याबाबत लक्ष ठेवणे गरजेचे झाला आहे. चांगलं आणि वाईट याबाबत मुलांना जागृत करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पालकांनी सतर्क राहणं योग्य असे देखील ऍड अशा शेरखाने-कटके यांनी सांगितले.

Last Updated : Nov 18, 2022, 5:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.