औरंगाबाद: संदिपान भुमरे आणि त्यांचा मुलगा विलास यांनी पदाचा गैरवापर करत कोट्यवधी रुपायांची शासकीय जमीन लाटली (Thirty crore fraud by plundering the land) आहे. याबाबत औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधिक्षक, लाचलुचपत विभाग, पोलिस अधिक्षक, पैठण उपविभाग आणि पैठण पोलिस स्टेशन यांच्याकडे यापुर्वी तक्रार दिली होती. परंतु माझ्या तक्रारी बाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद (High Court Bench Aurangabad) येथे फौजदारी याचिका दाखल केली होती. त्यात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, पैठण पोलीस उपविभाग कार्यालय आणि पोलिस स्टेशन पैठण कार्यालयात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती दत्ता गोर्डे यांनी दिली.
हे आहे प्रकरण
मंत्री संदिपान भुमरे आणि त्यांचा मुलगा विलास यांनी पैठण शहरातील महत्त्वाच्या जागी बेकायदा कब्जा केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे यांनी केला आहे. पैठणच्या मौक्याच्या जागी सहा हजार चौरस मीटर इतकी ही जागा आहे. या जागेची किंमत तीस कोटी रुपये इतकी झाली आहे. सिटी सर्वे क्रमांक 1026 ही जमीन नगर परिषद पैठण हद्दीमध्ये असून, ही जमीन महाराष्ट्र शासनाची आहे. असे असताना सुद्धा फक्त राजकीय वजन वापरून संदिपान भुमरे आणि त्यांच्या मुलाने ही जागा नोटरी करून 99 वर्षांच्या करारावर हस्तांतरित केल्याचा आरोप गोर्डे यांनी केला होता.
यांच्याविरुद्ध आहे तक्रार
कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, विलास संदीपान यांनी (तात्कालीन बांधकाम सभापती जिल्हा परीषद औरंगाबाद), सोमनाथ परदेशी (माजी नगराध्यक्ष नं. प. पैठण), ललीता सोमनाथ परदेशी, संजय जगन्नाथ शेळके, राम बाबासाहेब गटकळ, सतिश गोपीनाथ वाघ, योगेश सोमनाथ परदेशी, गोपाल कांतीलाल कायस्थ, करण ईश्वर परदेशी, नामदेव विनायक खराद, गणेश श्रीरंग मडके तसेच, तात्कालीन जिल्हाधिकारी औरंगाबाद, तात्कालीन तहसिलदार पैठण यांनी सर्वांनी पदाचा गैरवापर करून शासकीय भुखंड बेकायदेशीर रित्या हडप करून भ्रष्टाचार केेला. लोकप्रतिनिधींंनी गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य करून आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर रित्या शासकीय भुखंड हडप केलेला आहे. असा आरोप गोर्डे यांनी केला असून याप्रकरनाची चौकशी करून कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे.
हेही वाचा: भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा गंडा, अनेक व्यवसायिक कटात शामिल