ETV Bharat / state

सिल्लोड तालुक्यात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली जलसंधारण कामाची पाहणी

author img

By

Published : May 23, 2021, 2:18 PM IST

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली जलसंधारण कामाची पाहणी केली असून नवीन कामांचे तात्काळ प्रस्ताव सादर करून सुरू असलेली सिंचनाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. सिल्लोड तालुक्यातील अंजना ,चारणा या उपनद्यामध्ये सुरू असलेले सिंचन कामांची महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्यक्ष कामांवर जाऊन पाहणी केली.

अब्दुल सत्तार
अब्दुल सत्तार

सिल्लोड (औरंगाबाद)- तालुक्यात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली जलसंधारण कामाची पाहणी केली. तसेच नवीन कामांचे तात्काळ प्रस्ताव सादर करून सुरू असलेली सिंचनाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. सिल्लोड तालुक्यातील अंजना , चारणा या उपनद्यामध्ये सुरू असलेले सिंचन कामांची महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्यक्ष कामांवर जाऊन पाहणी केली. सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील प्रमुख व उपनद्यामध्ये नवीन सिंचनाची कामे करता येतील का, यासाठी सर्वेक्षण करून नवीन सिंचनाच्या कामांसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करा, सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी नियमाप्रमाणे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यावे यासोबतच तालुक्यातील सुरू असलेले सिंचनाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा, असे निर्देश सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली जलसंधारण कामाची पाहणी

2 कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे अंतिम टप्प्यात
सिल्लोड तालुक्यातील दिडगाव - उपळी शिवारातील अंजना नदीवर कोल्हापूरी बंधाऱ्यांच्या कामास सुरुवात झाली. सावखेडा येथील चारणा नदीवरील सुरू असलेल्या 2 कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे अंतिम टप्प्यात सुरू आहेत. अब्दुल सत्तार यांनी सुरू असलेल्या या कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांशी बोलत असतांना सत्तार यांनी वरील निर्देश दिले. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, डॉ.संजय जामकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी यतीन कोठावळे, जलसंधारण अधिकारी आर. पी. दांडगे आदि उपस्थित होते.

36 बंधाऱ्याना मंजुरी
सिल्लोड - सोयगाव तालुक्यात जलसंधारण विभाग अंतर्गत जवळपास 36 सिमेंट बंधाऱ्याच्या कामासाठी मंजुरी मिळालेली असून येत्या 4 दिवसात हे कामे सुरू होतील, अशी माहिती देत सिल्लोड -सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन पिके घेता यावी यासाठी मोठ्या प्रमाणावर सिंचनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. सदरील कामे शेतकऱ्यांच्या हिताची असल्याने शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होवून सहकार्य करावे असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

हेही वाचा-'लहान मुलांमधील कोरोना' या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बालरोग तज्ज्ञांसोबत संवाद

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.