ETV Bharat / state

Asasuddin Owaisi : विरोधकांचा आमच्यावर विश्वास आहे का? विरोधी पक्षाच्या बैठकीला न बोलावल्याने ओवेसी नाराज - opposition party meeting in Patna

खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याचा प्रस्ताव दिला आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा राज्यभरात सुरू आहेत. पंकजा मुंडे नाराज असल्याचे कळाल्यानंतर खासदार इम्तियाज जलील स्वत: त्यांना भेटले होते, अशी माहिती एमआयएम पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी दिली आहे.

Asasuddin Owaisi
Asasuddin Owaisi
author img

By

Published : Jun 24, 2023, 5:02 PM IST

खासदार असदुद्दीन ओवेसी यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर : हवेचा रोख कळल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याचा प्रस्ताव दिला आहे. जेव्हा त्या नाराज आहे असे कळले, त्यावेळी जलील यांना स्वतः त्यांना भेटून प्रस्ताव दिला होता. आता त्यांनी ठरवावे असे मत एमआयएम पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केले. तर BRS पक्षाला आधीच आम्ही ऑफर दिली आहे, त्यानंतर सोबत येण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झालेली नाही, असे देखील ओवसी यांनी सांगितले.

बैठकीला बोलावलं नाही : कालच्या पाटण्याच्या बैठकीत MIM ला बोलावले नाही. भाजपला हरवण्यासाठी आमच्या पक्षाला दुर्लक्षित करून चालणार नाही. आम्हाला बोलवा आम्ही बैठकीला येऊ. विरोधकांचा आमच्यावर विश्वास आहे की, नाही हे मला माहीत नाही. आम्हाला का दुर्लक्षित केले, हे बरोबर नाही. मी स्वतःहून त्यांच्या बैठकीत जाणार नाही. भाजपाला हरवण्यासाठी अजेंडा गरजेचा असल्याचे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

फोटो ठेवण्याचा कायदा करा : प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरी जवळ गेले त्यावर बोलताना, बाळासाहेब आंबेडकर यांचा मी मान ठेवतो आणि ठेवत राहीन. फोटो ठेवण्यावरून राज्यातील पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी. महाराष्ट्रातील दंगली बरोबर नाही. कोल्हापूरमध्ये मागे घडलेल्या घटनेनंतर कोणते फोटो ठेवायचे नाही, याची यादी राज्य सरकारने बनवावी. गोडसेंचा फोटो ठेवावा यांचा ठेऊ नये असे सरकारने स्पष्ट करावे अशी टीका खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

पंतप्रधानांनी खोटं बोलू नये : पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर आहेत. आम्हालाही वाटते भारत अमेरिका संबंध चांगले व्हावे. पंतप्रधानांनी तिकडे पत्रकारांशी न बोलता दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधावा. भारतात अल्पसंख्याक समाजावर अन्याय होत नाही असे ते तिकडे म्हणाले. मणिपूरमध्ये चर्च जाळले त्याचे काय. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांवर शिष्यवृत्ती बाबत अन्याय होतो. अनेक उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या फोलोशिफवर गदा आणण्याचे काम सरकार करीत आहे. अल्पसंख्याकांच्या अन्यायाबाबत दिल्लीत पत्रकारांशी मोंदीनी बोलायला हवे अशी टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली.

हेही वाचा - Uddhav Thackeray : आम्ही कोणाच्या घरावर जात नाही, फडणवीसांनी आपले घर सांभाळावे- उद्धव ठाकरेंचा गर्भित इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.