ETV Bharat / state

Bhagat Singh Koshyari : भगतसिंह कोश्यारींचे पुन्हा वादग्रस्त विधान, म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज....'

author img

By

Published : Nov 19, 2022, 2:05 PM IST

Updated : Nov 19, 2022, 3:51 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापाठीच्या पदवी प्रदान कार्यक्रमात (BAMU convocation program) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले (Koshyari controversial statement on Shivaji) आहे. शिवाजी आता जुने झाले, आजच्या काळातील आदर्श घ्यायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापाठीच्या पदवी प्रदान कार्यक्रमात (BAMU convocation program) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले (Koshyari controversial statement on Shivaji) आहे. शिवाजी आता जुने झाले, आजच्या काळातील आदर्श घ्यायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

आधीच्या काळात शिवाजी महाराज आदर्श - शाळेत शिक्षण घेत असताना आम्हाला शिक्षक तुमचे आवडते नेते कोण असा प्रश्न विचारायचे तेव्हा आमच्यापैकी काही जण सुभाषचंद्र बोस,महात्मा गांधी तर काही जण पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव सांगायचे. आधीच्या काळात शिवाजी हेही आदर्श होते. आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते नितीन गडकरी पर्यंत अनेक नेते आयकॉन बनले आहेत. असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षांत समारंभ पार पडला.या कार्यक्रमात ते बोलत होते.

छत्रपती शिवाजी महारांजाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे वादग्रस्त विधान

भगतसिंह कोश्यारी यांनी केली स्तुती - मला राज्यात आल्यावर दोनदा गडकरी आणि पवार यांना पदवी देण्याचे भाग्य लाबले. याचे कार्य राष्ट्राला उपयोगी असल्याने त्यांना ही पदवी दिली. मात्र त्यांचे कार्य त्यापेक्षा अधिक आहे. आज इंग्रजी माध्यमातून अधिक शिक्षण घेतले जात आहे. त्यात काय वैशिष्ठ आहे माहीत नाही. आम्ही जिल्हा परिषद शिकलो, पाचवी नंतर इंग्रजी शिकलो. शरद पवार यांनी शेती करून कार्य केलें त्यामुळे राग आला तरी सखरेपेक्षा अधिक गोड असतात. ध्येय असणारे नेते आहेतं. गडकरी यांना तर रोडकरी देखील म्हणतात. शरद पवार माझ्यापेक्षा एक वर्षाने मोठे आहेत. कर्तुत्वाने तर अधिक पटीने मोठे आहेत. अस म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यावर स्तुती सुमने उधळली.

मराठी भाषेचा अभिमान हवा - आपल्याला आपल्या भाषेचा गर्व पाहिजे. इकडे महाराष्ट्रात मराठी पेक्षा हिंदी इंग्रजी जास्त बोलतात. आपल्या राज्यात मराठी नाही बोलणार तर कुठे बोलणार. मी पण मराठी समजतो. पेपर वाजतो. तुम्ही बोललेल मला कळत. देशात हिंदी भाषा बहुतांश लोकांना कळते. मातृभाषेचा अभिमान बाळगा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं. सरकारने मातृभाषेतून शिक्षण देण्याचा जो निर्णय घेतला आहे. तो कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले. अस मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्रात मराठीपेक्षा हिंदी इंग्रजी जास्त : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, की मला राज्यात आल्यावर दोनदा गडकरी आणि पवार यांना पदवी देण्याचे भाग्य लाभले. याचे कार्य राष्ट्राला उपयोगी असल्याने त्यांना ही पदवी दिली. मात्र त्यांचे कार्य त्यापेक्षा अधिक आहे. आज इंग्रजी माध्यमातून अधिक शिक्षण घेतले जात आहे. त्यात काय वैशिष्ट आहे ? माहीत नाही. आम्ही जिल्हा परिषदेत शिकलो, पाचवीनंतर इंग्रजी शिकलो. शरद पवार यांनी शेती करून कार्य केले. त्यामुळे राग आला तरी साखरेपेक्षा अधिक गोड असतात. ध्येय असणारे नेते आहेत. गडकरी यांना तर रोडकरी देखील म्हणतात. असे वक्तव्य कोश्यारी यांनी केले. शरद पवार माझ्यापेक्षा एका वर्षाने मोठे आहेत. कर्तुत्वाने तर अधिक पटीने मोठे आहेत. आपल्याला आपल्या भाषेचा गर्व पाहिजे. इकडे महाराष्ट्रात मराठीपेक्षा हिंदी इंग्रजी जास्त बोलतात. आपल्या राज्यात मराठी नाही बोलणार तर कुठे बोलणार. मी पण पेपर वाचतो, मराठी समजते. तुम्ही बोललेले मला कळते. देशात हिंदी भाषा बहुतांश लोकांना कळते, असेही कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले? विद्यापीठाचा कालखंड आठवतोय. देशाला घटनेच्या माध्यमातून संशोधित प्रणाली दिली. बाबासाहेबांनी याभागात शैक्षणिक प्रगती नसताना त्यांनी लक्ष घातले. मोलाची कामगिरी केली. त्या कालखंडात एक मर्यादा होत्या. शैक्षणिक संस्था म्हणले की अडचणी होत्या. त्यात औरंगाबादला शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा त्यांच्या निर्णयाने शिक्षणाचे मोठे जाळे उभे झाले. अनेक संघर्ष झाले. त्याची काही किंमत मला मोजावी लागली. दुसरे विद्यापीठ उभे राहीले, त्याचा भाग मला होता आले. मराठवाडा म्हणले की, शेती आणि सामान्य माणूस वेगळा संबंध आहे. शेती मर्यादित पिकांची होती, आज ती बदलली जात आहे. उसाचा मोठा भाग असणारा भाग होत आहे. नवीन संशोधन कसे आणता येईल ? याबाबत प्रयत्न सुरू आहेत. संस्थेच्या माध्यमातून अनेक काम होत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. नवीन प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यात जालना आणि नागपूर भागात नवीन संशोधन संस्था सुरू करणार आहोत. असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

विजय भटकर काय म्हणाले? कधी वाटले नव्हते की, देशात एक हजार विद्यापीठ तयार होतील. अनेक भागांमध्ये शिक्षण भेटते. तेव्हा मराठी भाषेत शिक्षण मिळेल. सुपर संगणक महत्वाचे आहे, मात्र हे शिक्षण मराठीसह देशातील इतर भाषांमध्ये मिळेल का ? असा प्रश्न पडला होता. भाषेत बदल झाला तर खूप प्रगती करू शकतो असे वाटते. लोकांना लिहिता वाचता आले पाहिजे. उच्च तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतो. हे शिक्षण मराठी भाषेत देऊ शकतो का ? असे सतत वाटत होते. हे आधुनिक ज्ञान आपल्या भाषेत घेण्याचा नवीन नियम आपण आपल्या नवीन उपक्रमात का घेतला ? या शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे. चांगले संस्कार दिले पाहिजे. शिक्षण म्हणजे संस्काराची देणे आहे. वाढती लोकसंख्या मोठे आव्हान असणार आहेत. तशी मोठी संधी आहे. त्यासाठी नवीन शिक्षण पॉलिसीसमोर आणण्याचा प्रयत्न केला. नाविन्य बदल गतीने का होतात? याच उत्तर शोधावे लागेल. देशासाठी नवीन शिक्षण प्रणाली महत्वाची ठरेल. साक्षरता हवी पण संगणक साक्षरता हवी. देशाचे राष्ट्रीय उत्पन्न पहिले जर जगात आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत. लवकरच आपण अजून पुढे जाऊ. लीडर कसे असावेत ते गडकरी आणि शरद पवार यांच्याकडे पाहून कळेल, असे भटकर (Vijay Bhatkar) म्हणाले.

Last Updated : Nov 19, 2022, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.