ETV Bharat / state

Chandrayaan 3 : विद्यार्थ्यांनी घेतला चंद्रयान 3 मोहिमेचा अनुभव, अनेकांनी व्यक्त केली शास्त्रज्ञ होण्याची इच्छा

author img

By

Published : Jul 14, 2023, 10:02 PM IST

चांद्रयान 3 चे यशस्वी उड्डाण अनुभवता येण्यासाठी एमजीएम संस्थेत शालेय विद्यार्थ्यांसाठी थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील 15 शाळांमधील विद्यार्थ्यांनी रुक्मिणी सभागृहात चांद्रयान 3 चे प्रक्षेपण पाहिले. यावर काही विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चांद्रयान 3 चे प्रेक्षेपण देशासाठी अभिमानाची बाब आहे. चांगला अभ्यास करून पुढील मोहिमेत सहभागी होण्याची आमची इच्छा आहे, असे ते म्हणाले.

Chandrayaan 3
Chandrayaan 3
विद्यार्थ्यांनी घेतला चंद्रयान 3 मोहिमेचा अनुभव

औरंगाबाद : चांद्रयान 3 चे यशस्वी उड्डाण झाले आहे. प्रत्येकाला देशासाठी अभिमानास्पद क्षण अनुभवता यावा यासाठी एमजीएम संस्थेत शालेय विद्यार्थ्यांसाठी थेट प्रक्षेपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जसजसे क्राफ्टने टप्पे पूर्ण केले तसतशी उत्सुकता वाढत गेली. आजच्या चांद्रयान 3 च्या उड्डाणानंतर विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञ बनण्याची इच्छा व्यक्त केली केली आहे. चांगला अभ्यास करून पुढील मोहिमेत सहभागी होण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी चागंली तयारी करु, अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली. तर चाळीस दिवसानंतर जेव्हा यान चंद्रावर उतरेल त्यावेळी पुन्हा विद्यार्थ्यांना चांद्रयान 3 पाहायला मिळेल अशी माहिती शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली.

दीडशे विद्यार्थ्यांनी पाहिले प्रक्षेपण : रुक्मिणी सभागृहात एमजीएम स्पेस स्टडीज सेंटरतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी चांद्रयान III चे थेट प्रक्षेपण पाहण्याचे आयोजित करण्यात आले होते. या मोहिमेचे महत्त्व काय? अंतराळयान चंद्रावर गेल्यावर नेमके काय होईल? जगाच्या पाठीवर देशाचा सन्मान कसा होईल, याची माहिती देण्यात आली. यापूर्वीची मोहीम, सध्याची मोहीम यातील फरक यावरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी पुढील 40 दिवस कसे वेगवेगळे अनुभव येतील. त्यादरम्यान कोणते उपक्रम केले जातील याची माहिती दिली. मोहीम पूर्ण होईपर्यंत शालेय मुलांना विज्ञानाची गोडी निर्माण केली जाईल, असे औंधकर म्हणाले.

विद्यार्थ्यांनी अनुभवला ऐतिहासिक क्षण : शहरातील 15 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी रुक्मिणी सभागृहात अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चांद्रयान अंतराळात गेल्याचा क्षण मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला. मोहिमेची माहिती सुरू होताच विद्यार्थ्यांना देण्यात आली. अंतराळयानाच्या प्रक्षेपणानंतरची पुढील 15 मिनिटे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. त्यानंतर पुढील वेग काय असेल याबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती ऐकली. त्यानंतर या शुभ मुहूर्ताचे साक्षीदार झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. इतकेच नाही तर, आज या मोहिमेमुळे काही विद्यार्थ्यांना भविष्यात वैज्ञानिक बनण्याची इच्छा निर्माण झाली आहे. चाळीस दिवसांनी जेव्हा हे यान चंद्रावर पोहोचेल तेव्हा आपल्यालाही हाच अनुभव येईल, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. आजच्या प्रसारणामुळे पुस्तकाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

हेही वाचा - Chandrayaan 3 : इस्रोचे चांद्रयान 3 अवकाशात झेपावले! ; असे झाले प्रक्षेपण, पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.