ETV Bharat / state

Pimpal Purnima 2023 : पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा! पुरुषांनी साजरी केली पिंपळ पौर्णिमा, पत्नी पीडितांच्या 'या' आहेत मागण्या - Vat Purnima 2023

'ही बायको पुन्हा नको रे बाबा' असे म्हणत पत्नी पीडित पुरुषाने पिंपळाच्या झाडाला उलट्या प्रदक्षिणा घातल्या आहेत. वट सावित्रीला प्रत्येक सुहासिनी हाच पती जन्मोजन्मी मिळावा यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या घालतात. मात्र, पत्नी पीडित संघटना याला विरोध करत एक दिवस आधी पिंपळाच्या झाडाची पूजा करुन सात जन्म ही बायको नको, असे साकड देवाकडे मागत आहेत.

Chhatrapati Sambhaji Nagar News
पुरुषांनी साजरी केली पिंपळ पौर्णिमा
author img

By

Published : Jun 2, 2023, 5:51 PM IST

माहिती देताना भारत फुलारे

छत्रपती संभाजीनगर: कौटुंबिक समस्या ग्रस्त पत्नी पिडीत पुरुष आश्रमात वटसावित्री पौर्णिमेच्या पूर्व संध्येला पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली. विवाहित महिला वटसावित्री पौर्णिमा साजरी करून सात जन्म हाच पती मिळावा यासाठी पूजा अर्चा करतात. मात्र आपल्या बायकोपासून त्रस्त असलेले नवरे या दिवशी पिंपळाच्या झाडाला पूजन करून, ही बायको पुन्हा नको अशी विनंती करतात. इतकेच नाही तर, बायकोनी केलेली विनंती मान्य करू नको, असे साकडे पिंपळाच्या झाडाला घालतात. गेल्या अनेक वर्षांपासून पुरुषांच्या हक्काचे देखील कायदे असावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती, संघटनेचे अध्यक्ष भारत फुलारे यांनी दिली.

पिंपळाच्या झाडाचे पूजन: दरवर्षी विवाहित महिला वटसावित्रीची पौर्णिमा उत्साहात साजरी करतात. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारून जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे अशी विनंती त्या करतात. मात्र असे काही पुरुष आहेत जे आपल्याला पुन्हा ही पत्नी नको अशी विनंती करतात. शहरातील करोडी भागात पत्नीपीडित आश्रम अशाच पुरुषांसाठी काम करते. गेल्या पाच वर्षांपासून वटसावित्री पौर्णिमेच्या आदल्या दिवशी संघटनेतील पुरुष पिंपळाच्या झाडाची पूजा करतात. पिंपळ म्हणजे मुंजा, अविवाहित असलेल्या असलेल्यांना मुंजा म्हणले जाते. त्यामुळे या झाडाचा पूजन करून त्रास देणाऱ्या बायका पुन्हा नको अशी विनवणी केली जाते. विधिवत पूजा करून पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारत, पत्नीने लावलेला धागा काढून टाक आणि आम्हाला या पत्नीपासून मुक्तता दे अशी विनंती केली जाते. अशा छळणाऱ्या बायकांपेक्षा आम्ही अविवाहित बरे अशी इच्छा संघटनेतील पुरुष करतात.

Chhatrapati Sambhaji Nagar
पत्नी पीडित संघटनेने केली मागणी

पुरुषांना न्याय द्या: दिवसेंदिवस पुरुषांवरील अन्याय अत्याचारात वाढ होत चालली आहे. महिला अबला होत्या त्यावेळी महिलांच्या सबलीकरणासाठी वेग -वेगळे कायदे बनले गेले. परंतु ते कायदे बनवताना पुरुषांवर अन्याय होऊन, पुरुष अबला होतील याचा विचारच न केल्याने आज खऱ्या अर्थाने पुरुष हतबल झाला आहे. त्यामुळे पुरुष सबलीकरण करण्यासाठी एकतर्फी कायदे रद्द होऊन, पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे आहे. लग्न झाल्यावर त्यांची संपत्ती पैसा पाहिजे असते. पत्नी केवळ आपल्या पतीवारच केस दाखल करत नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबावर केसेसचा मारा करून सर्व कुटुंब उध्वस्त करते. असा आरोप पत्नी पीडित संघटनेचे अध्यक्ष भरत फुलारी यांनी केला. पत्नी आपल्या पतीवर एक नाही तर अनेक जसे ४९८ अ, डोमेस्टिक व्हायलन्स, सीआरपीसी १२५, ३०७ आयपीसी अश्या अनेक केसेसचा मारा करते. त्यांच्यावर केसेसचा भडिमार झाल्यास तो आयुष्यातून उध्वस्त होतो. जेलमध्ये जातो व त्यातून सुटलाच तर शेवटी आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबतो.

दिवसेंदिवस पुरुषांवरील अन्याय अत्याचारात वाढ होत आहे. पुरुष सबलीकरण करण्यासाठी एकतर्फी कायदे रद्द होऊन, पुरुषांना देखील कायद्याचे संरक्षण मिळावे. बायकोपासून त्रस्त असलेले नवरे या दिवशी पिंपळाच्या झाडाला पूजन करून, ही बायको पुन्हा नको अशी विनंती केली. बायकोनी केलेली विनंती मान्य करू नको, असे साकडेही घालतले. - पत्नी पीडित संघटना

पत्नी पीडित संघटनेने केलेल्या मागण्या: पत्नी पीडितांच्या प्रमुख मागण्या अश्या आहे की, पुरुषांसाठी स्वतंत्र पुरुष आयोग बनवावा. एकतर्फी कायद्यावर बंदी आणावी. प्रत्तेक पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापन करावी.जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र देखील स्थापन करावे. कौटुंबिक वाद माननीय न्यायालयात गेल्यास एका वर्षाच्या आत निकाली काढावे. अश्या बहुतांश मागण्या आहे परंतु न्याय मिळत नसल्याने आंदोलन करावे लागते. संस्थेचे अध्यक्ष एड.भारत फुलारे, उपाध्यक्ष सुरेश फुलारे, सचिव चरणसिंग गुसिंगे, वैभव घोळवे, सोमनाथ मनाळ, एकनाथ राठोड, भाऊसाहेब साळुंके, प्रवीण कांबळे, भिक्कन चंदन, श्रीराम तांगडे, संजय भांड यांच्यासह इतर सदस्य पिंपळ पूजनात सहभागी झाले.

हेही वाचा -

  1. Aurangabad सात जन्म काय सात सेकंद देखील ही बायको नको वटपोर्णिमेच्या आधी पत्नी पीडितांनी केली पिंपळाच्या झाडाची पुजा
  2. पुढच्या जन्मी अशी बायको नको रे बाबा पुरुषांनी चक्क पिंपळाच्या झाडाची केली पूजा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.