ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये पुन्हा टाळेबंदी..?,‌ मुंबईच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता - औरंगाबाद कोरोन बातमी

कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता औरंगाबादमध्ये पुन्हा अंशतः टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

photo
टाळेबंदी
author img

By

Published : Mar 7, 2021, 9:03 PM IST

Updated : Mar 7, 2021, 10:40 PM IST

औरंगाबाद - कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यावेळी अंशता लॉक टाळेबंदी औरंगाबादमध्ये असणार आहे. रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत औरंगाबादमध्ये संचारबंदी असणार आहे. तर शनिवार आणि रविवार पूर्णता संचारबंदी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. 11 मार्च ते चार एप्रिल या दरम्यान अंशतः टाळेबंदी औरंगाबाद शहरामध्ये असेल. आज कॅबिनेट बैठक झाल्यानंतर याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

माहिती देताना मंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद शहरात अंशतः टाळेबंदीसह कार्यक्रमांवरबही निर्बंध लादण्यात आले आहेत. लग्न समारंभ, सभा आठवडी बाजार, तरण तलाव, मॉल, शाळा बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संदर्भाचे सर्व नियम पाळणे आवश्यक असल्याचा अवाहन औरंगाबादच्या नागरिकांसह राज्यातील सर्व जनतेला करण्यात आले आहे. जेणेकरून वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल.

हेही वाचा - विक्रीसाठी आणलेल्या 5 पिस्तुल अन् 28 जिवंत काडतुसे जप्त; दोघांना अटक

कॅबिनेट बैठकीत मुंबई संदर्भात देखील चर्चा

आज (दि. 7 मार्च) झालेल्या कॅबिनेट बैठकीत मुंबई संदर्भात देखील चर्चा झाली आहे. मुंबईमध्ये रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असली तरी सध्या कोणतेही निर्बंध नव्याने लादण्याचा कोणताही निर्णय बैठकीत घेण्यात आलेला नाही. मात्र, मुंबईची वाढणारी आकडेवारी नक्कीच चिंताजनक असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - लॉकडाऊनच्या अफवेने जाधववडी भाजी मंडईत खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी

Last Updated : Mar 7, 2021, 10:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.