ETV Bharat / state

कन्नडच्या पिशोर भिलदरीत पोलिसांची धाड; शेतातून लाखोंचा गांजा जप्त

author img

By

Published : Dec 7, 2019, 1:34 PM IST

कन्नड तालुक्यातील पिशोर भिलदरी येथील एका शेतातून पोलिसांनी ६६ किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत १ लाख ९६ हजार ८३० रुपये एवढी आहे.

aurangabad
जप्त केलेल्या गांजासोबत पोलीस अधिकारी

औरंगाबाद- कन्नड तालुक्यातील पिशोर भिलदरी येथील एका शेतातून पोलिसांनी ६६ किलो गांजा जप्त केला आहे. या गांज्याची किंमत १ लाख ९६ हजार ८३० रुपये एवढी आहे. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अधिक माहिती अशी की, भिलदरी जाहगीर गावातील रामकिसन साडुदास वैष्णव (बैरागी) याने शेतातील अद्रक व मक्याचा पिकांमध्ये गांजाची झाडे लावली असल्याची गुप्त बातमी पोलीस उपअधीक्षक जगदीश सातव यांना मिळाली होती. त्याआधारावर पोलीस उपअधीक्षक सातव हे पोलीस नाईक केसरसिंग राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल राहुल लहाने, महेश जाधव यांनी पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी घेऊन रामकिसन वैष्णव यांचा शेतात गेले. शेतात पोलिसांना अद्रक व मक्याबरोबर हिरवीगार जीवंत गांजाची झाडे दिसली. पोलीस पथकानी ती झाडे मुळासोबत उपटली. पोलिसांनी एकूण १७ गांजाची झाडे व तोडून ठेवलेली गांजाची झाडे असा एकूण १ लाख ९६ हजार ८३० रुपयांचा माल जप्त केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक बजरंग धनसिंग कुठंबरे यांच्या तक्रारीवरून रामकिसन बैरागी यांच्यावर पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार करीत आहे.

हेही वाचा- भाजपमध्ये ओबीसींवर अन्याय होतो असे मला वाटत नाही - महादेव जानकर

Intro:कन्नड़ तालुक्यातील पिशोर भिलदरी येथे शेत गट नंबर 265 भिलदर शिवारात पोलिसांचा गुप्त माहिती नुसार खबर मिळाली की रामकिसन बैरागी यांचा शेतात गांजा झाडाची लागवड केलेली मिळाली, पोलिस उपाधीक्षक यांनी त्यांचा पथकासह शेतात जाऊन पाहणी केली त्या मधे 66 किलो गांजा चा माल मिळाला त्यांची किंमत 1 लाख 96 हजार 830 रूपायाचा माल जप्त केला आहे.
Body:अधिक माहिती अशी की पोलिस उपअधीक्षक जगदीश सातव यांना गुप्त बातमी मिळाली की भिलदरी जाहगीर गावातील रामकिसन साडुदास वैष्णव (बैरागी) याने शेतातील अद्रक व मक्याचा पिकामधे गाज्याचा झाडाची लागवड केलेली आहे. पोलिस उपअधीक्षक जगदीश सातव यांचा सह पोलिस नाईक केसरसिंग राजपूत, पोलिस कॉन्स्टेबल राहुल लहाने, महेश जाधव यांनी पिशोर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक जगदीश पवार यांचा सह पोलिस कर्मचारी घेऊन रामकिसन वैष्णव यांचा शेतात गेले असता मका व् अद्रक पिक उभे असलेले शेतात हिरवीगार जीवत गांजा ची झाडे दिसली पोलिस पथकानि ती झाडे मुळा सोबत उपटुन घेतली अशी एकूण 17 गांजा ची झाडे व तोडून ठेवलेली गांजा ची झाडे असा एकूण 1 लाख 96 हजार 830 रुपयांचा माल जमा केला आहे.
Conclusion:.
यावरून पोलिस उपनिरीक्षक बजरंग धनसिंग कुठंबरे यांचा फिर्यादिवरुण रामकिसन बैरागी यांचा वर नार्कोटिक ड्रक्स कायद्यानुसार पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक जगदीश पवार हे तपास करीत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.