औरंगाबाद - कन्नड येथील सिद्दिकी चौक ते तहसील कार्यालया NRC आणि नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकाच्या (CAB) विरोधात शांतता मोर्चा काढण्यात आला. जमियत उलमा हिंद मौलाना मैमुद मदनी संघातर्फे हा मोर्चा काढण्यात आला. यांसदर्भातील निवेदन तहसीलदार संजय वारकड यांच्याकडे सोपवण्यात आले.
स्वातंत्र्य चळवळीतून उदयास आलेली भारताची कल्पना, देशाचे आर्किटेक्ट आणि आमच्या राज्यघटनेत नमूद केले आहे. त्याप्रमाणे संबंधित विधेयकातील नागरिकत्वाचा निकष म्हणून या धर्माच्या इतिहासाला मूलभूत ब्रेक ठरेल. तसेच घटनेच्या मूलभूत संरचनेशी विसंगत ठरेल, अशा संदर्भातील मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी होते.
हेही वाचा - अशांत ईशान्य : 'कॅब' विरोधी आंदोलन चिघळलं, पोलीस गोळीबारात चार जणांचा मृत्यू!
यावेळी मोर्चात सहभागी सदस्यांनी काळ्या फिती बांधल्या तसेच काळे झेंडे आणि या विधेयकांविरोधात विरोधी पोस्टर दाखवून भाजप सरकारचा विरोध केला. या शांतता मोर्चात मोठा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.