ETV Bharat / state

Maratha Reservation : आतापर्यंत मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही? मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं कारण

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलंय. मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत, अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. मनोज जरांगेंच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केलाय.

Maratha Reservation
मनोज जरांगे पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 10:49 PM IST

प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation : ओबीसी समाजाच्या नेत्यांवर आणि आमदारांच्या घरांवर हल्ले झाल्याबाबत मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी रोष व्यक्त केला. मात्र, हे हल्ले कोणी केले याची चौकशी लावावी. आम्ही याला कधीही समर्थन केलं नाही. उलट उद्रेक करू नका असं आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत, असं स्पष्टीकरण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिलं. आम्ही मराठा युवकांवर कारवाई करू नका, असं म्हणतोय. मात्र, जे आंदोलक शांततेच्या मार्गानं आंदोलन करतात त्यांच्यावर मुद्दाम ठरवून कारवाई केली जातं आहे. ती करू नका असं मी म्हटलं होतं, असं जरांगे पाटील म्हणाले.

नियमानं आरक्षण मागत आहोत : आम्हाला कुणबी समाजाचे दाखले दिल्यावर आमचा ओबीसीत समावेश होईल. मात्र, त्यामुळं आरक्षण संपणार नाही. नियमानं ओबीसीत समावेश करायचा असेल तर आयोग स्थापन करून तशी शिफारस करावी लागते. आम्ही तसंच करत आहोत. इतके दिवस तुमच्याच दबावामुळे आरक्षण मिळू शकलं नाही. हक्काचे आरक्षण आहे आणि आम्ही ते घेऊन राहू, आम्हाला आरक्षण द्यायचं नाही म्हणून आता ओरड केली जात आहे. कुणबी समाजाच्या नोंदी सापडत आहेत, त्याबाबत छगन भुजबळ टीका करत असून, एकदम नोंदी कशा मिळाल्या असा प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र, आम्ही घोळ केला नाही, आम्ही काय रात्रीतून कागद टाकले नाहीत. कोणताच ओबीसी बांधव यावर आवाज उठवणार नाही, त्यांना आमच्या मागण्या मान्य आहेत, असं म्हणत जरांगे पाटील यांनी भुजबळांवर टीका केली.

जनगणना करण्याची मागणी : मराठा गरीब मुलांना न्याय मिळणं गरजेचं आहे. ही बाब त्यांना माहिती असल्यानं ते याबाबत काही म्हणणार नाहीत. आम्ही गावागावात जाऊन ओबीसी बांधवांशी चर्चा करून या नेत्यांच्या नादी लागू नका. आपण आनंदानं राहू, असं सांगणार असल्याचं देखील जरांगे पाटील यांनी सांगितलं. तर जनगणना करण्याची मागणी भुजबळ करत आहेत. तुम्ही स्वतः सरकारमध्ये आहेत, तुम्ही ते करू शकतात. जर ते तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा. प्रत्येक गावात आमचे कार्यकर्ते आहेत, ते मराठा समाजासह कोणत्या समाजाचे किती लोक आहेत याबाबत ते स्वतः नोंदी घेऊन तुम्हाला देतील. म्हणजे जनगणना लवकर होईल आणि कोणत्या समाजाचे किती लोक हे देखील स्पष्ट होईल, असेही जरांगे पाटील म्हणाले.

झालेल्या घटनांची चौकशी करावी : बीडमध्ये जो काही प्रकार घडला, त्याबाबत सखोल चौकशी करणे गरजेचं आहे. तो हल्ला एखादा समाज म्हणून केला गेलेला नाही. त्याबाबत एसआयटी समिती स्थापन करण्यात आली आहे. अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी लाठीमार केला, यामागे मोठे षडयंत्र आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, हा कट कोणी घडवुन आणला? त्याची चौकशी करा. जे पोलीस अधिकारी बोलत नव्हते ते आता बोलत आहेत. याआधी आम्हीच पोलिसांना बळीचा बकरा बनवला जातोय असं म्हणलं होतो. मात्र, आता पोलीस अधीक्षक याबाबत बोलतात. पोलिसांची देखील चौकशी करावी, लाठी हल्ला करण्याचे आदेश कोणी दिले? या सर्वांची देखील सखोल चौकशी करावी, त्यातही एसआयटी स्थापन करून त्यानुसार कारवाई करावी. आमच्या हक्काचे आरक्षण आहे आणि आम्ही ते घेऊन राहू, असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला. भुजबळ किंवा कोणी काही म्हणू, त्यांच्या म्हणण्यानुसार कायदा चालणार नाही. सहानुभूती मिळवण्यासाठी अनेक प्रकार केले जात असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा -

  1. Manoj Jarange Patil : संभाजीराजेंनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; 'राज्यातील कुणबी पुरावे तपासले जाणार'
  2. Maratha Reservation : सामाजिक मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण नाही
  3. Maratha Reservation Suicide : मराठा आरक्षणासाठी तब्बल 'इतक्या' आत्महत्या; मराठवड्यात प्रमाण जास्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.