ETV Bharat / state

गोयल विरोधात मराठा क्रांती मोर्चाची पोलीस तक्रार

भाजपच्या जय भगवान गोयल यांनी 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे लिखाण करत ते प्रकाशित केले, त्यानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. समाज माध्यमांवर निषेध व्यक्त करण्यात येत असताना रस्त्यावर उतरून देखील गोयल यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. औरंगाबादच्या पुंडलीक नगर पोलिसात मराठा क्रांतीमोर्चातर्फे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मराठा क्रांंती मोर्चातर्फे औरंगाबादमध्ये जय भगवान गोयल यांच्या पुस्तकाविरोधात निषेध नोंदविण्यात आला

author img

By

Published : Jan 13, 2020, 4:14 PM IST

औरंगाबाद - भाजपच्या जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे भावना दुखवल्याने मराठा क्रांती मोर्चातर्फे औरंगाबादच्या पुंडलीक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आली आहे. गोयल यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे महाराजांचा अवमान असून मराठा क्रांतीमोर्चा हे कदापी सहन करणार नाही. महाराष्ट्रात पुस्तक विक्रीही करू देणार नाही, अशी भूमिका घेत असल्याचे मराठा क्रांतीमोर्चा तर्फे सांगण्यात आले आहे.

मराठा क्रांंती मोर्चातर्फे औरंगाबादमध्ये जय भगवान गोयल यांच्या पुस्तकाविरोधात निषेध नोंदविण्यात आला

मराठा क्रांतीमोर्चा तर्फे पुंडलीक नगर भागात जय भगवान गोयल यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. गोयल यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. त्यांच्या फोटोला जाळून मराठा क्रांतीमोर्चाच्या समन्वयकांनी आपला रोष देखील व्यक्त केला.

हेही वाचा - कुटुंब साखरपुड्याला जाताच चोरट्यांनी साधला डाव, भर दिवसा घरफोडी

गोयल यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. मात्र, तसे होत नसल्याने जय भगवान गोयल विरोधात सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे पुंडलीक नगर येथे गोयल यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. गोयल यांच्या फोटोला जोडे मारत त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केली. इतकेच नाही तर त्यांचा फोटो जाळून पुस्तक मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्रात हे पुस्तक विक्री होऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने यावेळी घेण्यात आली.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये कार-मोटारसायकलच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; तीन जखमी

Intro:भाजपच्या है जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे भावना दुखवल्याने मराठा क्रांती मोर्चातर्फे औरंगाबादच्या पुंडलीक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देण्यात आली आहे. गोयल यांनी लिहिलेलं पुस्तक म्हणजे महाराजांचा अवमान असून मराठा क्रांतीमोर्चा हे कदापि सहन करणार नसून महाराष्ट्रात पुस्तक विक्री करू देणार नाही अशी भूमिका घेत असल्याच मराठा क्रांतीमोर्चा तर्फे सांगण्यात आलं आहे.

Body:मराठा क्रांतीमोर्चा तर्फे पुंडलीक नगर भागात जय भगवान गोयल यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. गोयल यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. इतकंच नाही तर त्यांच्या फोटोला जाळून मराठा क्रांतीमोर्चाच्या समनव्यकांनी आपला रोष व्यक्त केला.Conclusion:भाजपच्या जय भगवान गोयल यांनी आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचा लिखाण करत ते प्रकाशित केल. त्यानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर निषेध व्यक्त करण्यात येत असताना रस्त्यावर उतरून देखील गोयल यांचा निषेध केला जात आहे. औरंगाबादच्या पुंडलीक नगर पोलिसात मराठा क्रांतीमोर्चा तर्फे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. गोयल यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. मात्र तस होत नसल्याने जय भगवान गोयल विरोधात सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे पुंडलीक नगर येथे गोयल यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. गोयल यांच्या फोटोला जोडे मारत त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली. इतकंच नाही तर त्यांचा फोटो जाळून पुस्तक मागे घ्यावं अशी मागणी केली. महाराष्ट्रात पुस्तक विक्री होऊ देणार नाही अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली आहे.
Byte - रमेश केरे पाटील - मराठा क्रांतीमोर्चा समनव्ययक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.