जालना Manoj Jarange Patil Press Conference : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्यात. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला इशारा दिलाय. तुम्ही जर अर्धवट आरक्षण देत असाल तर ते मी घेणार नाही आणि तुम्ही ते देऊ पण नका, असं ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील : पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना शांततेनं आंदोलन करण्याचं आवाहन केलंय. तसंच कुणीही आत्महत्या करू नका. मी कालपासून पाणी पित आहे. तुम्ही खाद्यांला खांदा लावू लढा, असंही ते म्हणाले. तसंच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं. एका पुराव्यासह आरक्षण देता येतं. समितीकडे आरक्षणासाठी अनेक पुरावे आहेत, असंही ते म्हणाले.
मराठ्यांना आरक्षण का नाही? : पुढं ते म्हणाले की, अर्धवट मराठा आरक्षण आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही ते देऊ पण नका. मराठा आरक्षणाकरिता स्वतंत्र अधिवेशन घेण्यात यावं. ज्यांना घ्यायच त्यांनी कुणबीतून आरक्षण घ्यावे. 60 टक्के मराठ्यांना कुणबीतून आरक्षण मिळत आहे. शेतीवर आधारित 16 ते 17 जातींना आरक्षण मिळाले. मग, मराठ्यांना आरक्षण का नाही? असा सवालही त्यांनी केला. तसंच 2004 मधील मराठा व कुणबी एक असल्याचा जीआर दुरुस्त करावा, असंही मनोज जरांगे म्हणाले.
राजकीय नेत्यांना गावबंदी कायम : राजकीय नेत्यांना गावबंदी कायम असल्याचंही ते यावेळी म्हणाले. पुढं आंदोलकांना सूचना देत ते म्हणाले की, मराष्ट्रातील मराठा समाज १०० टक्के शांत आहे. फक्त साखळी व आमरण उपोषण सुरू ठेवा. नेत्याकडं जाण्याची गरज नाही आणि त्यांनाही इकडे येऊ द्यायचं नाही. मराठा समाजानं संयम धरावा.
हेही वाचा -
- Maratha Reservation Protest : बीडमध्ये संचारबंदीसह इंटरनेट सेवा बंदचा दुसरा दिवस, हिंसाचार प्रकरणी 49 जणांना अटक
- CM talk to jarange patil on phone call : मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन जरांगे पाटीलांशी साधला संवाद; २० मिनिटांच्या चर्चेत नेमकं काय?
- All Party Leaders Meeting : आंदोलकांच्या संतापानंतर मुंबईत सर्वपक्षीय मराठा आमदारांची गोपनीय ठिकाणी बैठक, काय घेणार निर्णय