ETV Bharat / state

23 सप्टेंबरला झालेल्या महिलेच्या मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर...; वाचा, काय घडले?

एमआयडीसी वाळुजमधील मृत अनिता (४२, रा. जोगेश्वरी, नाव बदलले आहे) हिच्या पतीचे गेल्या बारा ते तेरा वर्षांपुर्वी निधन झाले. पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. पतीच्या निधनानंतर आधार हवा म्हणून तिने एका परप्रांतीयासोबत संसार मांडायचे स्वप्न पाहिले. पण दोन ते तीन महिन्यातच परप्रांतीय तिच्यापासून दुरावला.

accused
आरोपी
author img

By

Published : Oct 22, 2021, 12:10 AM IST

औरंगाबाद - एका महिलेचा विहिरीत मृत्यू झाल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी घडली होती. गुन्हे शाखा आणि एमआयडीसी वाळुज पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावत मारेकरी सुनील धोंडीराम खरात (५१, मुळ रा. महालक्ष्मी खेडा, ता. गंगापूर) याला अटक केली आहे. मात्र, या घटनेचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आता तू म्हातारा झाला आहे, तेव्हा आपण भाऊ-बहिणीसारखे राहू असे म्हटलेल्या प्रेयसीला आरोपीने अगदी प्रेमाने मक्याच्या शेतात नेले. तेथे शारिरीक संबंध करण्याची इच्छा व्यक्त करत मातीत डोके दाबून जीव गेल्यावर तिला विहीरीत फेकून दिल्याचे समोर आले आहे. मात्र, मुलांनी थेट पोलिसांना हकीकत कथन केल्यामुळे गुन्ह्याची उकल झाली.

एमआयडीसी वाळुजमधील मृत अनिता (४२, रा. जोगेश्वरी, नाव बदलले आहे) हिच्या पतीचे गेल्या बारा ते तेरा वर्षांपुर्वी निधन झाले. पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. पतीच्या निधनानंतर आधार हवा म्हणून तिने एका परप्रांतीयासोबत संसार मांडायचे स्वप्न पाहिले. पण दोन ते तीन महिन्यातच परप्रांतीय तिच्यापासून दुरावला. यानंतर काही दिवसांनी विवाहित असलेला वाहनचालक सुनील खरात तिच्या आयुष्यात आला. त्याचे आणि अनिताचे सूत जुळले. दोघांच्या अनैतिक संबंधांची माहिती सुनीलच्या पत्नीला कळाली. त्यामुळे सुनीलची पत्नी दोन्ही मुलींना घेऊन निघून गेली. त्यानंतर सुनील अनितासोबतच राहू लागला. तिला हवे नको, ते सगळे प्रॉपर्टी विकून दिले. सुनीलपासून अनिताला एक मुलगा देखील झाला. अनिताला कोणताही त्रास होऊ नये, याची सुनील काळजी घेत होता. तिला कोठेही मजूरी कामासाठी जाऊ देत नव्हता. मात्र, अशात अनिताची वागणूक त्याला खटकू लागली होती. त्यामुळे त्याचा अनितावर दाट संशय होता.

हेही वाचा - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे दुबईला गेले होते, नवाब मलिक यांचा दावा

अनैतिकतेकडून अनैतिकतेकडे -

सुनीलसोबत अनिताचे अनैतिक संबंध आहेत. याची तिच्या माहेरच्या मंडळींना देखील कल्पना होती. सुनीलचा अनितावरील संशय वाढत जात होता. याचदरम्यान, तिचे एका बांधकाम ठेकेदारासोबत अनैतिक संबंध असल्याचे सुनीलला समजले. मात्र, त्यावर सुनील गप्प बसला होता. त्याने अनिताला कोणतीही भनक लागू दिली नव्हती.

अनिता बोलल्याचे खटकले

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला अनिताच्या मोबाइलवर सुनीलने संपर्क साधला होता. तेव्हा अनिताने त्याला आता तू म्हातारा झाला आहे. त्यामुळे आपण आता भाऊ-बहिणीसारखे राहू असे म्हणाली. त्याचा सुनीलला भयंकर राग आला. पण त्याने मोबाइलवर बोलताना व्यक्त केला नाही. २९ सप्टेंबर रोजी त्याने अनिताला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तिने जोगेश्वरी भागात भेटण्यासाठी बोलावले. तेव्हा अनिता आजारी मुलाला रुग्णालयात घेऊन गेली होती. मुलासह जोगेश्वरीतील रस्त्यावरुन जाताना सुनील तिला भेटला. त्याने शारिरीक संबंध करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे अनिताने मुलाला घरी पाठवले.

मक्याच्या शेतात केली हत्या -

शारिरीक संबंधासाठी दोघेही एकलहेरा येथील मक्याच्या शेतात गेले. त्यावेळी नुकतीच पावसाला सुरुवात झाली होती. तेथे शारिरीक संबंध करण्याच्या बहाण्याने सुनीलने शेतातील मातीत अनिताचे डोके खुपसले. श्वास गुदमरुन अनिताने हातपाय थंड पडल्यानंतर शेतापासून २० ते २५ फुट अंतरापर्यंत त्याने अनिताला खांद्यावर उचलून नेले. त्यानंतर विहीरीच्या कठड्यावरुन तिला खाली ढकलून दिले. याचवेळी त्याने अनितासह स्वत:चा मोबाइल फेकून दिला.

मुलांची पोलिसात धाव पण -

बरेच दिवस उलटून देखील अनिता घरी परतली नव्हती. मात्र, तिने सुनीलसोबत जात असल्याचे बहिणीला कळवले होते. २ आॅक्टोबर रोजी अनिताचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. मात्र, तिची हत्या नेमकी कशामुळे झाली. याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला नव्हता. तत्पुर्वी एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. अशातच ७ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखा पोलिसांना अनिताची मुले भेटली. पोलिसांनी मुलांकडे घटनेबाबत चौकशी करुन जोगेश्वरीच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. याशिवाय तांत्रिक पुरावे देखील गोळा केले. त्यानुसार, सुनीलचा शोध घेत गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, सहायक फौजदार सतीश जाधव, जमादार सुधाकर मिसाळ, जितेंद्र ठाकुर, रविंद्र खरात, सुनील बेलकर, विजय पिंपळे व नितीन देशमुख यांनी अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.