ETV Bharat / state

धक्कादायक! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन शाळकरी मुलींवर अत्याचार - child abuse case in aurangabad

गारखेडा गावातील एका किराणा दुकान चालकाने एका शाळेत शिकणाऱ्या २ अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरात नेऊन, दोघांवरही अत्याचार केला. तसेच याबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसात गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन शाळकरी मुलींवर अत्याचार

author img

By

Published : Feb 18, 2020, 7:47 PM IST

औरंगाबाद - चॉकलेटचे आमिष दाखवून एका दुकानदाराने २ अल्पवयीन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नराधमाविरुद्ध चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे. बाबुराव चौधरी असे आरोपीचे नाव आहे.

धक्कादायक! चॉकलेटचे आमिष दाखवून दोन शाळकरी मुलींवर अत्याचार

गावातील एका किराणा दुकान चालकाने एका शाळेत शिकणाऱ्या २ अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरात नेऊन, दोघांवरही अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तसेच कुणाला हा प्रकार सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर पुन्हा या नराधमाने दोघींना परिसरातल्या एका शेतात नेऊन त्यांच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार केला, आणि या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही या मुलींना दिली.

हेही वाचा - औरंगाबादेत मायलेकीचा खून? रुग्णवाहिका नसल्याने मृतदेह खांद्यावरून नेण्याची नामुष्की...

हा प्रकार पीडित मुलींपैकी एकीने तिच्या आईला सांगितल्यानंतर आईने पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार नोंदवली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी किराणा दुकान चालवणाऱ्या बाबुराव चौधरी नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटकेत घेतले आहे.

हेही वाचा - मायलेकीचा संशयास्पद मृत्यू, विहिरीत आढळला मृतदेह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.