ETV Bharat / state

ढाकेफळ परिसरात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस; पिकांचे मोठे नुकसान - औरंगाबाद पाऊस बातमी

पैठण तालुक्यातील ढाकेफळसह ढोरकीन, लोहगाव, शेवता, तारुपिंपळवाडी, आमरापुरवाघूंडी, बोरगाव, टाकळी, ७४ जळगाव गावात जोरदार पाऊस झाला. यात ऊस, मोसंबी, लिंबू, बाजरी, मूग, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे शासनाकडून पाहणी व पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेती पिकांचे मोठे नुकसान
शेती पिकांचे मोठे नुकसान
author img

By

Published : Sep 6, 2020, 3:39 PM IST

Updated : Sep 6, 2020, 4:00 PM IST

औरंगाबाद - पैठण तालुक्यातील ढाकेफळसह ढोरकीन, लोहगाव, शेवता, तारुपिंपळवाडी, आमरापुरवाघूंडी, बोरगाव, टाकळी, ७४ जळगाव गावात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. गुरुवारी सायंकाळी आठच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शेकडो हेक्टर ऊस, मोसंबी, लिंबू, बाजरी, मूग, कापूस अशा उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

ढाकेफळ परिसरात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस

सलग चार वर्षापासून पडत असलेल्या अवर्षण, कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी पुरता दुष्टचक्रात अडकलेला आहे. चालू वर्षी जूनपासून वेळेवर सुरू झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, मागील ऑगस्ट महिन्यात 15 ते 20 दिवस सलग संततधार बरसत राहिलेल्या पावसाने बरेच दिवस सूर्यदर्शनही होत नव्हते त्यामुळे पाणथळ व सखल जमिनीवरील पिके पिवळी व रोगट होऊन पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. अशातच अधिक पावसाची गरज नसताना गुरुवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस व विजांचा कडकडाट सुमारे दीड ते दोन तास निसर्गाच्या या रौद्र तांडवा पुढे शेतकरी राजा मात्र पुरता हतबल झाला आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे शासनाच्या महसूल आणि कृषी विभागामार्फत पाहणी व पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ढाकेफळ परिसरातील हरीभाऊ शिसोदे, मल्हेराव मरकड, रावसाहेम रकड, ज्ञानेश्वर मरकड, रामेश्वर शिसोदे, अरुण आव्हाड, रविंद्र रणशूर, गणेश शिंदे, कृष्णा आदमाने, अंकुश बोरुडे, सुखदेव ईथापे, रौउफ शेख संतोष एरांडे, रानूबा अवधूत, सुरेश अवधूत, गोरख बोबडे, भागचंद डोळस आदी शेतकरी करत आहेत.

Last Updated : Sep 6, 2020, 4:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.