औरंगाबाद - मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी औरंगाबाद शहरात दाखल झाली. यावेळी औरंगाबादेत ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर काही ठिकाणी भव्यदिव्य पुष्पहार क्रेनला लावून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली बहुचर्चित महाजनादेश यात्रा मंगळवारी संध्याकाळी औरंगाबादेत दाखल झाली. यावेळी चिकलठाणा येथे म्हडाचे अध्यक्ष संजय कणेकर यांनी जंगी स्वागत केले. एका भल्या मोठ्या क्रेनच्या साहाय्याने पुष्पहार घालून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. तर चिकलठाणा येथे स्थानिक कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात या जनादेश यात्रेचा स्वागत केले. महाजनादेश यात्रेच्या वेळी मुख्यमंत्र्यासोबत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्यमंत्री अतुल सावे सह मोजकेच पद्धधिकारी मुख्य वाहनावर दिसले.
हेही वाचा - केंद्राप्रमाणे आता राज्यातही विरोधी पक्षनेता राहणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
क्रेनने पुष्पहार घालण्याचा ट्रेंड
राज्यात एखादी निवडणूक जिंकल्यावर, प्रचार यात्रेत लोक प्रतिनिधींना क्रेनने पुष्पहार घालण्याचा ट्रेंड वाढला आहे. क्रेनने हार घालून समर्थकांना काय साध्य करायचे आहे हा मोठा प्रश्न आहे.
हेही वाचा - मराठवाड्यात चांगला पाऊस व्हावा म्हणून औरंगाबादेत भव्य 'कावड यात्रे'चे आयोजन