ETV Bharat / state

Look Back 2022: सरत्या वर्षातले राजकीय धक्के, औरंगाबाद राहिले चर्चेत; वाचा 2022'चा मागोवा - Happy News Year

तसतर औरंगाबादची संवेदनशील जिल्हा म्हणीन ओळख आहे. मात्र, चालू वर्षात औरंगाबादमध्ये बऱ्याच घडोमोडी ( Year Ender 2022 Aurangabad ) घडल्या. (Happy News Year 2023) एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादेतले शिवसेनेचे सहापैकी पाच आमदार फोडत सत्तास्थापन केली . अनेक चांगल्या वाईट घडामोडी घडल्या त्या पाहूत.

Look Back 2022
औरंगाबाद राहिले चर्चेत, वाचा 2022'चा मागोवा
author img

By

Published : Dec 31, 2022, 9:20 AM IST

औरंगाबाद : नवीन वर्षाच्या आगमनासाठी सर्व नागरिक सज्ज झाले ( Year Ender 2022 Aurangabad ) आहेत. मात्र मागील वर्षात शहरात झालेल्या अनेक घटनांमुळे राज्यभर जिल्हा चर्चेला राहिला. शिवसेनेचे पाच आमदार फुटल्याची घटना असो की युवतीवर रिक्षा चालकाने केलेले अश्लील वर्तन, प्रियकराने एकतर्फी प्रेमातून युवतीला केलेला जाळण्याचा प्रयत्न अशा घटनांमुळे हे वर्ष जिल्ह्यासाठी वेगळे ( Year Ender 2022 ) राहिले.

  • शिवसेनेचे सहापैकी पाच आमदार फुटले : 2022 हे वर्ष राजकीय दृष्ट्या सर्वात धक्कादायक ( Look Back 2022 ) ठरले. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला धक्का देत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना फोडत, सरकारला पायउतार होण्यास भाग पाडले. विशेषतः शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबाद मधे शिवसेनेच्या सहापैकी पाच आमदारांनी एकनाथ शिंदे गटाला साथ देत, शिवसेनेसोबत दगा फटका केला. त्यामुळे राज्यात सर्वाधिक चर्चा झाली ती औरंगाबाद जिल्ह्याची. शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल, रमेश बोरणारे, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे आणि संजय शिरसाट हे आमदार फुटले. त्यामुळे शिवसेनेला मोठा हजारा बसल्याचं चित्र पाहायला ( Eknath Shinde Government In Power ) मिळाले.
  • पहिल्यांदा मिळाली चार मंत्री पद : शिंदे - फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर जिल्ह्याला पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्ष नेतापद मिळाले. शिंदे गटातील संदिपान भुमरे यांना मंत्रिपदासह पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. अब्दुल सत्तार यांना देखील कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले तर भाजपच्या गटातून अतुल सावे यांना देखील कॅबिनेट मंत्री पद मिळाले. तीन मंत्री पद मिळाले असताना विरोधी पक्षनेते पदी अंबादास दानवे यांची निवड ( Four Minister Elected First Time ) झाली. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही जिल्ह्याला मिळाले. तर दोन केंद्रीय मंत्री पद देखील जिल्ह्याला मिळाले आहेत. त्यामुळे मंत्रांचा जिल्हा म्हणून वेगळी ओळख औरंगाबादला मिळाली.
  • रेल्वेच्या चाळीस वर्षांच्या मागणीला न्याय : औरंगाबाद जिल्हा मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखला जातो. मात्र सुविधांचा अभाव हा नेहमीच दिसून आला. त्यात रेल्वेच्या अनेक मागण्या दरवर्षी केल्या जातात, मात्र त्या पूर्ण होत नाहीत. त्यातील एक महत्त्वाची मागणी म्हणजे रेल्वेचे इलेक्ट्रिफिकेशन. विजेवर रेल्वे चालविण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले ( Electrification Railways Will Run In Aurangabad ) गेले. आंदोलन देखील केले गेले, मात्र कधीही न्याय मिळाला नाही. मात्र 2022 यावर्षी इलेक्ट्रिफिकेशनच काम पूर्ण तास आले असून, नवीन वर्षात औरंगाबाद ते मनमाड रेल्वे ही विजेवर धावणार ( Aurangabad to Manmad Electric Railway ) आहे. त्यामुळे मुंबईला जाण्याचा अर्धा ते पाऊण तासाचा वेळ प्रवाशांचा वाचणार आहे.
  • रेल्वे बोगीचे भाग तयार करण्याच्या प्रकल्पाची घोषणा : मराठवाडा आता रेल्वे बोगी तयार करणारा भाग ठरणार ( Railway Bogie Manufacturing Part project )आहे. लातूर येथे एक प्रकल्प सुरू असताना आता सीमेन्स लिमिटेडने रेल्वे बोगी उत्पादनासाठी औरंगाबाद येथे उत्पादन प्रकल्प उभारला असून आगामी काळात 200 हून अधिक रेल्वे बोगींचा पुरवठा करेल. अशी घोषणा करण्यात आली. कारखान्यात देशांतर्गत आणि जागतिक रोलिंग स्टॉक आवश्यकता पूर्ण करण्यास सक्षम असलेली अत्यंत लवचिक उत्पादन लाइन आहे. हे प्रवासी, कोच, लोकोमोटिव्ह, इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट्स, ट्राम आणि मेट्रोसाठी उच्च-कार्यक्षमता बोगी तयार करते. सीमेन्स लिमिटेडचा मोबिलिटी व्यवसाय त्याच्या रोलिंग स्टॉक, रेल्वे ऑटोमेशन आणि इलेक्ट्रिफिकेशन, टर्नकी सिस्टीम तसेच संबंधित सेवा या मुख्य क्षेत्रांमध्ये त्याच्या पोर्टफोलिओमध्ये सतत नवनवीन करत आहे. डिजिटलायझेशनसह, ते मोबिलिटी ऑपरेटरना पायाभूत सुविधा बुद्धिमान बनविण्यास, संपूर्ण जीवनचक्रात मूल्य टिकवून ठेवण्यासाठी, प्रवाशांचा अनुभव वाढवण्यासाठी आणि उपलब्धतेची हमी देण्यास सक्षम करत आहे. अस कंपनीतर्फे सांगण्यात (Year Ender 2022 Special ) आले.
  • रिक्षातून युवतीने मारली उडी : रिक्षाचालकाने अश्लील भाषेत संभाषण केल्याने क्लास संपून घरी जाणाऱ्या मुलीने चालत्या रिक्षातून उडी घेतल्याची धक्कादायक घटना( Violence Against Women Increas ) घडली. या घटनेत मुलीच्या मेंदूला जबर मार लागला आहे. पीडित युवती "नीट"च्या तयारीसाठी क्लासला गेली होती. रोज तिचे वडील किंवा भाऊ तिला घ्यायला येत असायचे. मात्र त्या दिवशी दोघे नसल्याने गोपाल-टी सेंटर येथून ती रिक्षात बसली. त्यावेळी ती एकटीच रिक्षात होती. शिल्ल्लेखाना चौक जवळ रिक्षा चालकाने तिच्याशी खाजगी गप्पा सुरू केल्या. त्यावेळी चालकाने अचानक अश्लील विषयावर बोलायला सुरुवात केली. युवतीला काय करावं सुचत नव्हतं. ती घाबरली रिक्षा चालकाचे वर्तन योग्य नसल्याने तिने धावत्या रिक्षातून उडी मारली. तिच्या डोक्याला जबर मार लागला. पोलिसांनी तातडीने रिक्षाचालक सय्यद अकबर याला अटक केली असून त्याची रिक्षा जप्त केली.
  • युवकाने स्वतः सह मैत्रिणीला पेटवले : नोव्हेंबर महिन्यात स्वतः सह मैत्रिणीला आगेच्या कवेत घेणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला. गजानन मुंडे अस त्याचे नाव असून आगीत तो नव्वद टक्के भाजला होता. गजानन याने तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःलाही जाळून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला, शहरातील शासकीय विज्ञान संस्थे मध्ये पी.एचडी करणाऱ्या पूजा साळवे या मैत्रिणीला त्याने मिठी मारली. यात मुलगा ९० टक्के तर मुलगी 50 टक्के जळाली होती, दोघांवरही घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यात युवकाचा मृत्यू झाला तर युवतीवर उपचार सुरू आहेत.
  • राजेश भोसले यांची देशासाठी तीन पदकांची कमाई : नेपाळ येथे होणाऱ्या सातव्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स जलतरण व ॲथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या राजेश भोसले यांनी देशासाठी तीन पदकांची कमाई केली आहे. यात दोन सुवर्ण आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे. ही स्पर्धा 50 ते 55 वयोगटातील खेळाडूंसाठी घेण्यात झाली होती. त्यात राजेश भोसले यांनी देशाचे प्रतिनिधित्व करत 800 मीटर फ्रीस्टाइल आणि 1500 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. नेपाळ आणि कतारच्या जलतरणपटूंचा त्यांनी मागे टाकत यश संपादन केले. तर ॲथलेटिक्स मधे थाळीफेक प्रकारात कांस्यपदक प्राप्त झाले. देशासाठी त्यांनी तीन पदक जिंकत देशाची मान उंचावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.