ETV Bharat / state

औरंगाबाद मतदारसंघ : खासदार खैरेंविरोधात ३ आमदार निवडणुकीच्या मैदानात - overview

खैरे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने शिवसेनेची अंतर्गत नाराजी समोर येत आहे. तसेच खैरे यांचे भाजप पदाधिकाऱ्यांसोबत असलेले मतभेद यामुळं शिवसेनेला किल्ला लढवणं निश्चित अवघड जाणार असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

खासदार खैरेंविरोधात ३ आमदारांची लढत
author img

By

Published : Apr 10, 2019, 2:09 AM IST

Updated : Apr 10, 2019, 12:41 PM IST

औरंगाबाद - औरंगाबाद मतदारसंघात एक खासदार विरुद्ध ३ आमदार, अशी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे गेल्या २० वर्षांपासून औरंगाबादमधून निर्विवाद निवडणूक जिंकत आले आहेत. मात्र, यावेळची निवडणूक त्यांच्यासाठी निश्चितच परीक्षा घेणारी आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात सेना आमदार हर्षवर्धन जाधव, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि काँग्रेस आमदार सुभाष झांबड हे ३ आमदार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

औरंगाबाद मतदारसंघ

मतदारसंघाची पार्श्वभूमी

औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात गेल्या ३० वर्षापासून महानगरपालिकेवर शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे. इतकंच नाही तर गेल्या २० वर्षांपासून औरंगाबादचा खासदार हा शिवसेनेचाच राहिला आहे. मात्र, या बालेकिल्ल्यात आता शिवसेनाच अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. गेल्या २० वर्षांत औरंगाबादचा मंदगतीने होणारा विकास ही सर्वात मोठी डोकेदुखी शिवसेनेसमोर असणार आहे. गेल्या २० वर्षांत खासदार चंद्रकांत खैरे लोकप्रतिनिधी म्हणून प्रभावी ठरू शकले नाहीत. शहराची समांतर जलवाहिनी असो, की भूमिगत गटार योजना, या योजना अजुनही सुरू झालेल्या नाहीत. त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावा लागतोय. या शिवाय शहरात ज्या पद्धतीने विकास होणे अपेक्षित होते, तो विकासही झालेला नाही.

शहरांमध्ये एकही नवीन प्रकल्प आलेला नाही. औद्योगिक वसाहतीत अनेक कारखानदार आपला उद्योग दुसऱ्या राज्यात हलवण्याच्या मनस्थितीत आहेत. सोयी-सुविधांचा अभाव, हा या शहराच्या विकासाला मारक राहिला आहे. त्यामुळेच या वेळी खासदार चंद्रकांत खैरे हे निश्चित अडचणीत सापडले आहेत. औरंगाबाद शहर हे जाताय समीकरणापलीकडे कधी जाऊ शकलेले नाही. हिंदू विरुद्ध मुस्लीम, अशीच लढत गेल्या २० वर्षात औरंगाबादेत पाहायला मिळाली आणि याचाच फायदा शिवसेनेला नेहमी होत राहिला. यंदा खासदार खैरे यांचा पराभव करण्यासाठी जिल्ह्यातील तीन आमदार निवडणूक लढवत आहेत.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ९ पैकी ६ विधानसभा येतात. त्यात
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे (भाजप)
औरंगाबाद पश्चिम - संजय शिरसाट (शिवसेना)
औरंगाबाद मध्य - इम्तियाज जलील (एआयएमआयएम)
गंगापूर - प्रशांत बंग (भाजप)
वैजापूर - भाऊसाहेब चिकटगावकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
कन्नड - हर्षवर्धन जाधव (शिवसेना)

फुलंब्री, सिल्लोड, पैठण हे मतदार संघ जालना लोकसभा मतदार संघात येतात.

शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव (अपक्ष)मैदानात

कन्नड विधानसभेचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव लोकसभेच्या निवडणुकीत नशीब आजमवणार आहेत. हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव यांची पुण्याई हर्षवर्धन यांच्या कामी येते. काँग्रेससोबत मतभेद झाल्यावर हर्षवर्धन जाधव यांनी २००९ मध्ये मनसेतर्फे निवडणूक लढवत आमदारकी मिळवली. ५ वर्षांच्या कार्यकाळात हर्षवर्धन जाधव आणि राज ठाकरे यांच्यात बिनसल्याने हर्षवर्धन जाधव यांनी २०१४ मध्ये शिवसेनेतर्फे विधानसभा लढवत विजय मिळवला. मात्र, खासदार खैरे यांच्याशी सतत वाढत चाललेल्या वादानंतर हर्षवर्धन यांनी शिवसेनेला रामराम ठोकत शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना करत लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. हर्षवर्धन जाधव कन्नड आणि वैजापूर तालुक्यात आपली ताकद आणि मराठा क्रांती मोर्चात असलेला सक्रिय सहभाग यामुळे आपला विजय होऊ शकतो. याच आशेवर हर्षवर्धन यांनी लोकसभेच्या रिंगणार उडी घेतली आहे.

काँग्रेस उमेदवार - सुभाष झांबड

खैरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याने आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार आमदार सुभाष झांबड यांना आहे. गेल्या ६ वर्षापासून सुभाष झांबड हे काँग्रेसचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आहेत. गेल्या ६ वर्षात खासदारकी लढवण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागात आपला जनसंपर्क चांगलाच वाढवला आहे. आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबत झालेल्या वादानंतर आमदार सुभाष झांबड यांना लोकसभेचे तिकीट मिळणार नाही, अशी शक्यता होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी आमदार सुभाष झांबड यांच्या गळ्यात माळ टाकली. त्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडाचा झेंडा उगारला आहे. अब्दुल सत्तार यांचे बंड थंड जरी झाले असले तरी आता काँग्रेसच्या हातात हात घालणार नाही, अशी घोषणा अब्दुल सत्तार यांनी केली. मात्र, खासदार खैरे यांच्या विरोधात असलेली लाट आणि काँग्रेसची वाढलेली ताकद यामुळे आपला विजय होईल, असा विश्वास सुभाष झांबड यांनी व्यक्त केला आहे.

दलित आणि मुस्लीम मतावर आमदार इम्तियाज जलील यांची मदार

२०१९ ची लोकसभेच्या निवडणुकीत दलित आणि मुस्लीम मते निर्णायक ठरणार आहेत. २ ऑक्टोबर 2018 रोजी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीची घोषणा केली या सभेला प्रतिसाद चांगला मिळाला. त्यानंतर एमआयएम पक्षाने औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्व या २ मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्याने या मतदारसंघात एमआयएमची ताकद मोठी आहे. महानगरपालिकेत एमआयएमचे २५ नगरसेवक आहेत. त्यामुळे एमआयएमची ताकद ही खूप मोठी मानली जाते. त्याचबरोबर मुस्लीम समाजासोबत दलित आणि बहुजन समाज हा बहुजन वंचित आघाडीच्या मागे उभा असल्याने मोठी ताकत निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी एमआयएम पक्षाने औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार इम्तियाज जलील हे बहुजन वंचित आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दलित आणि मुस्लीम मतदार लोकसभा निवडणुकीचे निर्णायक मतदार, असतील यात शंका नाही.

शिवसेनेला नेहमी सोपी वाटणारी लोकसभा निवडणूक यावेळेस मात्र, चिंतेची ठरणार आहे. औरंगाबाद हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते. या प्रवेशद्वाराची रखवाली गेल्या २० वर्षांपासून शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे करत आहेत. मात्र, गेल्या २० वर्षात त्यांच्याबाबत निर्माण झालेली नाराजी हे यावेळच्या निवडणुकीची सर्वात मोठी डोकेदुखी असणार आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या जागी जर दुसरा उमेदवार रिंगणात उतरला असता तर ही निवडणूक शिवसेनेसाठी थोडी सोपी राहिली असती, असे काही शिवसैनिक सांगतात. मात्र, खैरेंच्या विरोधात अनेकजण नाराज असताना पुन्हा खैरे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेची अंतर्गत नाराजी आणि खैरे यांचे भाजप पदाधिकाऱ्यांसोबत असलेले मतभेद यांमुळे शिवसेनेला किल्ला लढवणे निश्चित अवघड जाणार असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

शिवसेनेचा विजय अवघड असला तरी खासदार खैरे यांना आपला विजय सोपा आणि सहज वाटतो आहे. गेल्या 20 वर्षांत शहराचा विकास केल्याचा दावा खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

खासदार खैरे यांना अनुकूल घटक

- महानगर पालिकेत सेनेची सत्ता
- जिल्हा परिषदेत सेनेची सत्ता
- मतदारांशी थेट दांडगा जनसंपर्क
- धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग आणि श्रद्धाळू स्वभाव

खैरे यांना प्रतिकूल घटक

- शहरात निर्माण झालेला कचरा प्रश्न
- शहरात असलेली पाणी टंचाई
- समांतर आणि भूमिगत गटार योजनेचे अर्धवट प्रकल्प
- शहरात न आलेले उद्योग

शहरातील काही योजना रखडल्या असल्या तरी त्या लवकरच पूर्ण होतील. नागरिकांना दिलेली वचने शिवसेना निश्चित पूर्ण करेल, असे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. काही झाले तरी निवडणुकीच्या आधी लोकांना शिवसेना गरजेची आहे. हे लक्षात येते त्यामुळे आपला विजय निश्चित होईल, असा विश्वास खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना - भाजपची युती झाल्याने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी खैरेंना मतदान करा, असा प्रचार भाजप करताना दिसत आहे.

जातीनिहाय मतदार

मराठा मतदार ७ लाख ४३ हजार मत
ओबीसी १ लाख ८५ हजार ७६४ मतदार
मुस्लीम ६ लाख ५० हजार १७५ मतदार
दलित ४ लाख ६४ हजार ४११ मतदार आहेत.

एकूण मतदार

पुरुष - ९,७८,८००
महिला - ८,७८ ,८२७
एकूण - १८, ५७,६४५

२०१४ मध्ये पडलेली मतं

चंद्रकांत खैरे (शिवसेना) - – ५ लाख २० हजार ९०२
नितीन पाटील (काँग्रेस) - – ३ लाख ५८ हजार ९०२
सुभाष लोमटे(आप) –- ११ हजार ९७४

Intro:औरंगाबाद लोकसभा निवडणूक राज्यात सर्वात लक्षवेधी अशी निवडणूक म्हणता येईल. औरंगाबाद मतदारसंघात एक खासदार विरोधात तीन आमदार अशी लढत पाहायला मिळणार आहे.

Body:शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हे गेल्या वीस वर्षांपासून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निर्विवाद निवडणूक जिंकत आले. मात्र यावेळची निवडणूक त्यांच्यासाठी निश्चितच परीक्षा घेणारी आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात सेना आमदार हर्षवर्धन जाधव, एमआयएम आमदार इम्तियाज जलील आणि काँग्रेस आमदार सुभाष झांबड हे तीन आमदार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

Conclusion:औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात गेल्या तीस वर्षापासून महानगरपालिकेवर शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व कायम राहिले. इतकंच नाही तर गेल्या वीस वर्षांपासून औरंगाबादचा खासदार हा शिवसेनेचाच राहिला आहे. मात्र या बालेकिल्ल्यात आता शिवसेनाच अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत गेल्या वीस वर्षात औरंगाबादचा खुंटलेला विकास ही सर्वात मोठी डोकेदुखी शिवसेनेसमोर असणार आहे. गेल्या वीस वर्षात खासदार चंद्रकांत खैरे लोकप्रतिनिधी म्हणून प्रभावी ठरू शकले नाहीत. शहरात अनेक विकासाच्या गोष्टी आजही सरकारी यंत्रणेने अडकलेले आहेत. शहराची समांतर जलवाहिनी असो ही भूमिगत गटार योजना या योजना सुरु झाल्या मात्र अनेक वर्षांपासून त्या पूर्ण होऊ शकलेले नाहीत. त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावे लागतोय. इतकंच नाही तर शहरात ज्या पद्धतीने विकास होणे अपेक्षित होता, तो विकास झालेला नाहीये. शहरांमध्ये एकही नवीन प्रकल्प आलेला नाहीये. औद्योगिक वसाहतीत अनेक कारखानदार आपला उद्योग ददुसऱ्या राज्यात हलण्याच्या मनस्थितीत आहेत. सोयी-सुविधांचाअभाव हा या शहराच्या विकासाला मारक राहिला आहे. त्यामुळेच या वेळेस खासदार चंद्रकांत खैरे हे निश्चित अडचणीत सापडले आहेत. बदल हवा मात्र बदल करत असताना उमेदवार कसा असावा याबाबत लोकांना शंका आहे. औरंगाबाद शहर हे जातीचा समीकरणाच्या पलीकडे कधी जाऊ शकलेले नाही. हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच लढत गेल्या वीस वर्षात औरंगाबादेत पाहायला मिळाले आणि याचाच फायदा शिवसेनेला नेहमी होत राहिला. मात्र यावेळेस जातीच्या समिकरणाबाहेर जाऊन मतदार विचार करत आहे. खासदार खैरे यांचा पराभव करण्यासाठी जिल्ह्यातील तीन आमदार निवडणूक लढवत आहेत.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघात 9 पैकी 6 विधानसभा येतात. त्यात
औरंगाबाद पूर्व
औरंगाबाद पश्चिम
औरंगाबाद मध्य
गंगापूर
वैजापूर कन्नड

तर फुलंब्री, सिल्लोड, पैठण हे मतदार संघ जालना लोकसभा मतदार संघात येतात.

शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव मैदानात
कन्नड विधानसभेचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव लोकसभेच्या निवडणुकीत नशीब आजमवणार आहेत. हर्षवर्धन जाधव यांचे वडील रायभान जाधव यांची पुण्याई हर्षवर्धन यांच्या कामी येते. काँग्रेस सोबत मतभेद झाल्यावर हर्षवर्धन जाधव यांनी 2009 मध्ये मनसे तर्फे निवडणूक लढवत आमदारकी मिळवली. पाच वर्षांच्या कार्यकाळात हर्षवर्धन जाधव आणि राज ठाकरे यांच्यात बिनसल्याने आवर्धननजधाव यांनी 2014 मध्ये शिवसेनेतर्फे विधानसभा लढवत विजय मिळवला. मात्र खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी सतत वाढत चाललेल्या वादानंतर हर्षवर्धन यांनी शिवसेनेला रामराम ठोकत शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना करत लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली. हर्षवर्धन जाधव कन्नड आणि वैजापूर तालुक्यात आपली ताकद आणि मराठा क्रांतीमोर्चात असलेला सक्रिय सहभाग यामुळे आपला विजय होऊ शकतो या आशेवर हर्षवर्धन यांनी लोकसभेच्या रिंगणार उडी घेतली आहे.

खैरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याने आपला विजय निश्चित होईल असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार आमदार सुभाष झांबड यांना आहे. गेल्या सहा वर्षापासून सुभाष झांबड हे काँग्रेसचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आहेत. गेल्या सहा वर्षात खासदार की लढवण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागात आपला जनसंपर्क चांगलाच वाढवला. आमदार अब्दुल सत्तार यांच्या सोबत झालेल्या वादानंतर आमदार सुभाष झांबड यांना लोकसभेचे तिकीट मिळणार नाही अशी शक्यता होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी आमदार सुभाष झांबड यांच्या गळ्यात माळ टाकली, त्यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडाचा झेंडा उगारला. अब्दुल सत्तार यांचे बंड थंड जरी झाल असला तरी आता काँग्रेसच्या हातात हात घालणार नाही अशी घोषणा अब्दुल सत्तार यांनी केली. मात्र खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात असलेली लाट आणि काँग्रेसची वाढलेली ताकद यामुळे आपला विजय होईल असा विश्वास सुभाष झांबड यांना आहे.

2019 ची लोकसभेच्या निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मते निर्णायक ठरणार आहेत. 2 ऑक्टोबर 2018 रोजी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडीची घोषणा केली या सभेला प्रतिसाद चांगला मिळाला. त्यानंतर एमआयएम पक्षाने औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्व या दोन मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्याने या मतदारसंघात एमआयएमची ताकद मोठी आहे. महानगरपालिकेत एमआयएमचे 25 नगरसेवक आहेत त्यामुळे एमआयएमची ताकद ही खूप मोठी मानली जाते. त्याचबरोबर मुस्लिम समाजा सोबत दलित आणि बहुजन समाज हा बहुजन वंचित आघाडी च्या मागे उभा असल्याने मोठी ताकत निर्माण झाली आहे. त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी एमआयएम पक्षाने औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. आमदार इम्तियाज जलील हे बहुजन वंचित आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दलित आणि मुस्लिम मतदार लोकसभा निवडणुकीचे निर्णायक मतदार असतील यात शंका नाही.

सेनेला नेहमी सोपी वाटणारी लोकसभा निवडणूक मात्र यावेळेस शिवसेनेसाठी चिंतेची निवडणूक आहे. औरंगाबाद हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जात. या प्रवेशद्वाराची रखवाली गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे करत आहेत. मात्र गेल्या वीस वर्षात त्यांच्याबाबत निर्माण झालेली नाराजी हे यावेळेसच्या निवडणुकीची सर्वात मोठी डोकेदुखी असणार आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या जागी जर दुसरा उमेदवार रिंगणात उतरला असता तर ही निवडणूक शिवसेनेसाठी थोडी सोपी राहिली असती. मात्र खैरेंच्या विरोधात अनेक जण नाराज असताना पुन्हा खैरे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेची अंतर्गत नाराजी आणि खैरे यांचे भाजप पदाधिकाऱ्यांसोबत असलेले मतभेद यामुळे शिवसेनेला किल्ला लढवण निश्चित अवघड जाणार असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

byte - संजय वरकड - विश्लेषक

शिवसेनेचा विजय अवघड असला तरी मात्र खासदार खैरे यांना आपला विजय सोपा आणि सहज वाटतोय. गेल्या 20 वर्षात शहराचा विकास केल्याचा दावा खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
खासदार खैरे याना अनुकूल घटक
- महानगर पालिकेत सेनेची सत्ता
- जिल्हापरिषदेत सेनेची सत्ता
- मतदारांशी थेट दांडगा जनसंपर्क
- धार्मिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग आणि श्रद्धाळू स्वभाव

खैरे याना प्रतिकूल घटक
- शहरात निर्माण झालेला कचरा प्रश्न
- शहरात असलेली पाणी टंचाई
- समांतर आणि भूमिगत गटार योजनेचे अर्धवट प्रकल्प
- शहरात न आलेले उद्योग

शहरातील काही योजना या रखडल्या असल्या तरी त्या लवकरच पूर्ण होतील नागरिकांना दिलेली वचने शिवसेना निश्चित पूर्ण करेल असं खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. काही झालं तरी निवडणुकीच्या आधी लोकांना शिवसेना गरजेची आहे हे लक्षात येतं त्यामुळे आपला विजय निश्चित होईल असा विश्वास खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.

byte - चंद्रकांत खैरे - खासदार

शिवसेना - भाजपची युती झाल्याने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी खैरेंना मतदान करा असा प्रचार भाजप करताना दिसत आहे.
मतदारांमध्ये
मराठा मतदार 7 लाख 43 हजार मत
ओबीसी 1 लाख 85 हजार 764 मतदार
मुस्लिम 6 लाख 50 हजार 175 मतदार
दलित 4 लाख 64 हजार 411 मतदार आहेत. त्यामुळे मतदार कौल कोणाला देणार हे एक खासदार आणि तीन आमदारांच नशीब ठरवणार आहे.

Last Updated : Apr 10, 2019, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.