ETV Bharat / state

Little Girl Kidnapping Plan: नऊ वर्षीय मुलीच्या सतर्कतेमुळे उधळला गेला अपहरणाचा कट; संशयिताचा चेहरा सीसीटीव्हीत कैद

शाळेच्या गेटवर पालकांची वाट पाहत असलेल्या चिमुकल्या मुलीचे अनोळखीने अपहरण करण्याचा प्रयत्न (little girl Kidnapping plan) केला. मात्र मुलीच्या सतर्कतेमुळे (vigilance of girl) अपहरणाचा कट उधळला (little girl Kidnapping plan foiled) गेला. औरंगाबादच्या सिडको भागातील जीगिषा शाळेत ही घटना घडली. Aurangabad little girl kidnapping case, Latest news from Aurangabad, Aurangabad Crime

Little Girl Kidnapping Plan
अपहरणाचा कट
author img

By

Published : Nov 26, 2022, 1:57 PM IST

औरंगाबाद : शाळेत येऊन एका अनोळखीने मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न (little girl Kidnapping plan) केला. मात्र मुलीच्या सतर्कतेमुळे (vigilance of girl) अपहरणाचा कट उधळला (little girl Kidnapping plan foiled) गेला. ही घटना घडली आहे औरंगाबादच्या सिडको भागातील जीगिषा शाळेत. वडिलांचे नाव सांगून मुलीला घ्यायला आलो अस या व्यक्तीने सांगितलं होत. संशयिताचा चेहरा सीसीटीव्ही कैद (kidnappers face caught on CCTV) झाला आहे. Aurangabad little girl kidnapping case, Latest news from Aurangabad, Aurangabad Crime

Little Girl Kidnapping Plan
संशयित अपहरणकर्त्याचा फोटो

वडिलांचे नाव घेऊन बोलावले मुलीला... सिडको भागातील जीगिशा शाळेत शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटल्यावर एका नऊ वर्षाच्या मुलीला घ्यायला एक अनोळखी व्यक्ती आला. तुला घ्यायला मला पप्पांनी पाठवले आहे. चल आपण घरी जाऊ असे तो म्हणत होता. त्यावेळेस मुलीने तुम्ही माझ्या ओळखीचे नाहीत. पप्पांना फोन लावा असे तिने सांगितले. त्या व्यक्तीने एक मोबाईल नंबर डायल केला, मात्र मुलीने हा नंबर पप्पांचा नाही असे म्हणले. इतकच नाही तर समोरची व्यक्ती बोलत असताना हा आवाज माझ्या पप्पांचा नाही असे म्हणत पुन्हा शाळेच्या गेटमध्ये गेली आणि शिक्षकांना या व्यक्तीसोबत जाणार नाही असे सांगितले.

मुलीच्या सतर्कतेमुळे टळले अपहरण... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको येथील एका किराणा दारात किराणा दुकानदाराची नऊ वर्षीय मुलगी जिगिशा इंटरनॅशनल स्कूल येथे शिकत आहे. दररोज पाच वाजता शाळा सुटल्यावर तिला न्यायला तिचे वडील येत असतात. मात्र त्या दिवशी त्यांना यायला उशीर झाला. दरम्यान अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाचा व्यक्ती आला. त्याने हर्षिताला हाक मारून हाताला धरत गेटच्या बाहेर नेले. त्यामुळे शिक्षकांना शंका आली नाही. मात्र त्यापुढे हर्षिताने मी तुम्हाला ओळखत नाही, मी तुमच्यासोबत येणार नाही असे म्हणले आणि त्यापुढे त्यांना फोन लावण्यास सांगत तिला खात्री पटली की हे पप्पांच्या परिचयातील नाही. त्यावेळेस ती शाळेत परतली शिक्षकांना याबाबत माहिती देतात. ज्यावेळेस त्यांनी बाहेर पाहिले तर ती व्यक्ती तिथून निघून गेलेली होती. त्यामुळे मुलीच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद... संबंधित व्यक्तीने गेटमध्ये जाऊन मुलीला हाताला धरून बाहेर नेले होते. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी अपहरणाचा प्रयत्न केला म्हणून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश राठोड अधिक तपास करीत आहेत. तर विशेष पथकाचे उपाधीक्षक अशोक अवचार यांनी आरोपच शोध सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.