ETV Bharat / state

गोदावरी पट्ट्यात बिबट्याचा वावर, वासराचा पाडला फडशा

गंगापूर तालुक्यातील कानडगाव, बगडी, ममदापूर परिसरात बिबट्याचा वावर असून परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. बगडी येथील शेतकरी नवनाथ पल्लारे यांच्या शेतात मंगळवारी शेतवस्तीवर बिबट्याने आठ वाजेदरम्यान शेतवस्तीवर असलेल्या वासरावर हल्ला करून फडशा पाडला आहे.

Leopard habitat in Gangapur taluka
Leopard habitat in Gangapur taluka
author img

By

Published : Mar 14, 2021, 3:32 PM IST

गंगापूर (औरंगाबाद) - गंगापूर तालुक्यातील कानडगाव, बगडी, ममदापूर परिसरात बिबट्याचा वावर असून परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. बगडी येथील शेतकरी नवनाथ पल्लारे यांच्या शेतात मंगळवारी शेतवस्तीवर बिबट्याने आठ वाजेदरम्यान शेतवस्तीवर असलेल्या वासरावर हल्ला करून फडशा पाडला आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असुन शेतवस्तीवर असलेली जनावरे गावात नेण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. वनविभागाने तात्काळ बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

वनविभागाने बिबट्याला तात्काळ जेरबंद करा - शेतकऱ्याची मागणी

गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असून अनेक शेतकऱ्यांना बिबट्या निदर्शनास आल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभीत आहे. काही दिवसांपूर्वी कानडगाव येथील शेतकरी इकबाल पटेल पाणी भरण्यासाठी शेतात गेले असता त्यांना रात्री अकरा वाजेच्या सुमारास बिबट्या दिसला. बिबट्या त्याच्यावर चाल करणार असल्याचे समजताच आरडाओरड करून जवळच पाणी भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना एकत्र केल्याने बिबट्याने धूम ठोकली. शेतकरी इकबाल पटेल यांनी सुटकेचा श्वास घेतला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळी असलेले ठसे तडस या हिंस्र प्राण्यांचे असल्याचे सांगितले. मंगळवारी रात्री शेतवस्तीवर असलेल्या गाईचा फडशा पाडल्याने परिसरातील शेतकऱ्यात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने या बिबट्यास तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.