औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील नागद परिसरातील लोंजा शिवारातील गट नंबर 18 मध्ये बिबट्या मृतावस्थेत आढल्याची घटना घडली आहे. बिबट्याचे शवविच्छेदन झाल्यांनतर त्याचा मृत्युचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहीती वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
गटनंबर 18 मधील शेतकरी रमेश गरदल राठोड यांचा शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी ही माहिती बोरमाळचे पोलीस पाटील दीपक मासरे यांना दिली. प्रादेशिक वनविभाग कार्यालय, नागद यांना माहिती मिळाली असता वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद गायके, सहायक वनसरक्षक एस. यु. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
शवविच्छेदनासाठी बिबट्याचा मृतदेह प्रादेशिक कार्यालयात नेण्यात आला आहे. प्रथम दर्शनी बिबटयाचे सर्व अवयव शाबूत असल्याचे गायके यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्युचे कारण समजू शकणार.
हेही वाचा - कन्नड तालुक्यातील हतनूरमध्ये 25 वर्षाच्या युवकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट